
Urfi Javed video: उर्फीन सोडली लाज.. कपडे काढून थेट भिंतीवर..
विचित्र फॅशन सेन्समूळे ओळखली जाणारी उर्फी जावेद ही कधी कोणती फॅशन करेल याचा काही भरोसा नाही. उर्फी जावेद कपड्यांवर वेगवेगळे प्रयोग करत असते आणि त्यामूळे ट्रोलच्या निशाण्यावर येते. आत्तापर्यंत लोकांनी उर्फी जावेदला पोत्यापासून ब्लेड, लोखंडी साखळी, इलेक्ट्रिक वायर ते मोबाइल सिमपर्यंत बनवलेल्या ड्रेसमध्ये पाहिले आहे. आता उर्फी जावेदने पुन्हा एकदा बोल्डनेसची हद्द पार केली आहे.
आता तर सोशल मीडिया यूजर्स उर्फी जावेदच्या फोटो आणि व्हिडिओची वाट पाहत असतात. काही चाहते तिच्या क्रिएटिव्हिटीची वाट पाहतात , तर काही उर्फी कोणत्या नव्या लेव्हलवर जाणार हे पाहण्यासाठी उत्सुक असतात. उर्फीही तिच्या चाहत्यांना नाराज करत नाही. दरवेळी वेगवेगळ्या फॅशनने ती चाहत्यांना हैराण करत असते.
हेही वाचा: वाचा किस्से बँकेच्या लाॅकररुममध्ये घडलेले...एका बँक अधिकाऱ्याच्याच तोंडून
उर्फी जावेद देखील सोशल मीडिया यूजर्सला आश्चर्यचकित करण्याची आणि मन जिंकण्याची कोणतीही संधी सोडत नाही. अशा परिस्थितीत उर्फी जावेदने पुन्हा एकदा नवी फॅशन ट्राय केली आहे. जे पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत.
उर्फी जावेदचा नवीन व्हिडिओ खरोखरच वेगळा आणि भयानक आहे. यावेळी उर्फीच्या अंगावर एकही कापड नाही.यावेळी लाल टेपचा वापर करत फॅशन केली आहे. उर्फीनं स्वतःला लाल टेपनं जमिनीवर चिकटवलं आहे. उर्फीने तिचे शरीराच्या काही अंगावर लाल टेप लावले आहे उर्फी जावेदचा हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे आणि काही वेळातच त्याला हजारो लाईक्स मिळाले आहेत.उर्फीच्या या व्हिडिओला चाहते गोंधळात आहेत.
एकीकडे उर्फीचे चाहते हा व्हिडिओ खूप पसंत करत आहेत आणि अभिनेत्रीचे खूप कौतुक करत आहेत, तर दुसरीकडे तिला ट्रोल देखील केले जात आहे. उर्फीच्या एका चाहत्याने लिहिलं- 'कमाल आहेस उर्फी'..., तर दुसऱ्याने लिहिले- 'नेहमीसारखचं अपेक्षित, कोणीही विचार करू शकत नाही ' त्याचवेळी एका ट्रोलने लिहिले - 'फॅशन इतकी घसरली आहे का?' तर दुसऱ्याने लिहिले- 'पुढच्या वेळी ते मासे, कोंबडी किंवा सरडा होऊन येईल.' उर्फी जावेद एमटीव्ही शो स्प्लिट्सविलामध्ये दिसत आहे.