esakal | कोरोनापासून बचाव करण्यासाठी अभिनेत्री उर्वशी रौतेला म्हणाली....
sakal

बोलून बातमी शोधा

Urvashi Rautela

या वेळी उर्वशीने सगळ्यांना सुरक्षित राहा, असा सल्ला दिला. मास्क आणि सॅनिटायर्झचा वापर करा, असेही ती म्हणाली.

कोरोनापासून बचाव करण्यासाठी अभिनेत्री उर्वशी रौतेला म्हणाली....

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई : ग्रेट गॅण्ड मस्ती, पागलपंत्ती, हेट स्टोरी 4 अशा काही चित्रपटांमध्ये अभिनेत्री उर्वशी रौतेलाने उत्तम काम केले आहे. तसेच मोठमोठ्या ब्रॅण्डसाठी मॉडेलिंगही केले आहे. लॉकडाऊनच्या काळात उर्वशीने अनेक पुस्तके वाचली तसेच पियानो वाजवायला ती शिकली आणि चित्रपटही तिने बरेच पाहिले. त्याबद्दल तिने सोशल मीडियावर सांगितले आहे. आता तिने एन. आर. ग्रुपचा मास्क आणि सॅनिटायझर्स लाँच केला. या निमित्ताने ती स्वत: मास्क आणि ग्लोव्ह्ज घालून आली.  

मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार ! मुंबईकरांनो हवामान खातं म्हणतंय....

उर्वशीने लाँच केलेली हे कोरोना फॅमिली किट थेट gokoronago.com या वेबसाईटच्या माध्यमातून खरेदी केली जाऊ शकते. लॉकडाऊनंतर झालेला हा कार्यक्रम सरकारच्या अटींचे पालन करूनच झाला. या वेळी उर्वशीने सगळ्यांना सुरक्षित राहा, असा सल्ला दिला. मास्क आणि सॅनिटायर्झचा वापर करा, असेही ती म्हणाली.

कोरोनावरील सर्वात प्रभावी अशा 'टॉसिलीझुमॅब'चा तुटवडा, परिणाम होंतोय नवी मुंबई ठाण्यातील रुग्णांवर

लॉकडाऊन दरम्यान एखाद्या प्रमोशनल कार्यक्रमात भाग घेणारी उर्वशी रौतेला बॉलिवूडची पहिली अभिनेत्री ठरली आहे. घराबाहेर जाऊन, उर्वशीने एन. आर. ग्रुपचा मुंबईत मास्क आणि सॅनिटायझरचा नवीन ब्रँड लॉन्च केला. ती म्हणाली, की सध्याची परिस्थिती खूप कठीण आहे. चित्रपटसृष्टी ठप्प झाली आहे आणि आता टीव्ही मालिकांचे चित्रीकरण सुरू झाले आहे. मास्क लावणे सगळ्यांनी बंधनकारक आहे. सॅनिटायर्झचा वापर करणे आवश्यक आहे. आपल्या आरोग्याची काळजी आपणच घेतली पाहिजे.  
 
...म्हणून केरळहून आलेलं वैद्यकीय पथक माघारी परतलंय; जाणून घ्या काय झालं तर...

एन. आर. ग्रुपचे नीलेश रघानी म्हणाले, "मास्क आणि सॅनिटायझर या वस्तू सध्याच्या काळात गरजेच्या झाल्या आहेत. आम्ही अत्यंत कमी किमतीत या वस्तू उपलब्ध केल्या आहेत.  एन.आर. ग्रुप gokoronago.com नावाची वेबसाईट सुरू करून सर्वसामान्यांना ही सुविधा देणार आहे व ज्यात 4 मास्क आणि 2 हँड सॅनिटायझर्स तसेच आवश्यक सुरक्षा वस्तू आहेत, मोफत घरपोच डिलिव्हरी देणार आहेत.