झीनत अमानच्या पतीला कोर्टाचा दिलासा;60 लाख रुपये भरावे लागणार होते

टीम ईसकाळ
Thursday, 31 December 2020

मुंबई उच्च न्यायालयाने 21 डिसेंबर रोजी झीनत अमान यांच्या बरोबर 1.2 कोटी रुपयांच्या तडजोडीवर स्वाक्षरी केली होती. त्यावरील व्याजापोटी सरफराज झीनत अमान यांना 60 लाख रुपये देणे लागत होते.

मुंबई - सर्वोच्च न्यायालयाने बॉलिवूडची प्रख्यात अभिनेत्री झीनत अमान यांच्या पतीला दिलासा दिला आहे. झीनत यांच्याबरोबर एका कायदेशीर प्रकरणात ते अडकल्याने त्यांना न्यायालयाने दंड ठोठावला होता. अखेर सरफराज यांना बुधवारी दिलासा मिळाला आहे. तसेच यापुढील आदेश येईपर्यंत जेल मधील अधिकाऱ्यांसमोर हजर न होण्याचा निकाल दिला आहे. 

बिग बॉस ड्रामा: राखी सावंतने फाडले राहुलचे कपडे, 'हेच जर महिलेच्या बाबतीत...' अली गोनीचा सवाल

सरफराज आणि झीनत अमान यांच्यात झालेल्या सामंजस्यात व तडजोडीनंतर 31 डिसेंबर पर्यत 60 लाख रुपये सरफराज यांनी दिलेले नाहीत. मुंबई उच्च न्यायालयाने 21 डिसेंबर रोजी झीनत अमान यांच्या बरोबर 1.2 कोटी रुपयांच्या तडजोडीवर स्वाक्षरी केली होती. त्यावरील व्याजापोटी सरफराज झीनत अमान यांना 60 लाख रुपये देणे लागत होते. मात्र त्यांनी ते दिले नाहीत. यावर कोर्टाने एक नवीन आदेश दिला. त्यात न्यायाधीश इंदिरा बॅनर्जी आणि अनिरुद्ध बोस यांनी सरफराज यांच्या वकिलाचा युक्तिवाद ऐकून घेतला. कोरोनाच्या कारणास्तव सरफराज यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. त्याचा फटका त्यांना बसला आहे. अशावेळी त्यांना झीनत अमान यांना पैसे देणे शक्य नव्हते. असा युक्तिवाद सरफराज यांच्या वकिलाने केला. 

सलमान माझ्यासाठी 'फरिश्ता': रेमो रिसुझा झाला भावनाशील 

न्यायालयाने यांवर दिलेल्या आदेशात असे म्हटले आहे की, प्रतिवादी असणाऱ्या झीनत अमान यांना नोटीस जाहीर केली आहे. त्यात त्यांना सरफराज यांच्याकडून देण्यात येणारे पैसे हे 13 जानेवारी 2021 पर्यत देण्यात यावे असे म्हटले आहे. सरफराज यांच्यावतीने सुमित टेटरवाल यांनी बाजू मांडली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

कोरोना आणि आपल्या आईचे आजारपण यात पैसे गेल्याने मोठ्या गंभीर परिस्थितीला सामोरे जावे लागल्याचे सरफराज यांनी यावेळी सांगितले. याशिवाय 2021 मध्ये सरफराज यांची एक सर्जरी होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Actress Zeenat Aman husband gets relief from court