अक्षय कुमारनंतर आता अजय देवगणनेही बनवलं कोरोनावर गाणं.. पहा 'ठहर जा' गाण्याचा व्हिडिओ

ajay
ajay
Updated on

मुंबई- देशात कोरोना व्हायरसचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होत आहे आणि म्हणूनंच या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी ३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे..या लॉकडाऊनमुळे सामान्य माणसापासून ते मोठ मोठ्या सेलिब्रिटींपर्यंत सगळ्यांनाच घरात बसावं लागत आहे..याचदरम्यान सोशल मिडियावर सेलिब्रिटी चांगलेच ऍक्टीव्ह होताना दिसतायेत..ते सतत कोरोनाविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी आणि लोकांना धीर देण्यासाठी त्यांच्या मेसेज लोकांपर्यंत वेगवेगळ्या गोष्टींद्वारे पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत..नुकतंच अक्षय कुमारचं कोरोना व्हायरसवरील 'तेरी मिट्टी' हे गाणं सोशल मिडियावर ट्रेंड होतंय..आणि आता अक्षय पाठोपाठ अजय देवगणनेही कोरोनावर गाणं तयार केलं आहे..

अक्षय नंतर आता अजय देवगणने बनवलं कोरोनावर गाणंअक्षयच्या तेरी मिट्टीसया कोरोनावरिल गाण्यानंतर आता अभिनेता अजय देवगणनेही एक खास गाणं कोरोनावर तयार केलं आहे जे आज रिलीज झालंय..अजय देवगणने तयार केलेलं हे गाणं अनिल वर्मा यांनी लिहिलंय तर मेहुल व्यासने याला आवाज दिलाय..

ठहर जा असं या गाण्याचं नाव असून या गाण्यातून अजयने देशातील नागरिकांना या कोरोना व्हायरसच्या महा-रोगराईत सगळ्यांनी आपल्या घरातंच रहा..आणि आपल्या कुटुंबावर प्रेम करा असा मेसेज देण्याचा प्रयत्न केला आहे..काही तासांपूर्वी रिलीज केलेल्या या गाण्याला दीड लाखांपेक्षा जास्त व्ह्युज मिळाले आहेत..

देशभरात आत्तापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या २४ हजाराच्या वर गेली आहे..आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, २४ हजार ५०६ लोक बाधित आहेत..यातील १८ हजार ६६८ लोक कोरोना पॉझिटीव्ह आहेत तर वेगवेगळ्या हॉस्पिटलमधील ५ हजार ६२ लोकांना डिस्चार्ज मिळाला आहे..मात्र यामुळे मृत्य झालेल्यांची संख्या ७७५ झाली आहे.. 

after akshay kumar now ajay devgn also made a song on corona  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com