Leena Nagwanshi: मनोरंजन विश्वाला आणखी मोठा धक्का! अभिनेत्रीने आत्महत्या करत संपवलं जीवन..

Leena Nagwanshi
Leena NagwanshiEsakal
Updated on

सध्या मनोरंजन विश्वात तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणाचीच चर्चा आहे. वयाच्या २०व्या वर्षी तिने आत्महत्या करत जीवन संपवलं मात्र तिच्या मृत्यूनंतर अनेक प्रश्न निरुत्तरीत असतांनाच आणखी एका सोशल मीडिया स्टारने आत्महत्या करत आपलं जीवन संपवलं आहे. (social media influencer Leena Nagwanshi Commits Suicide)

छत्तीसगडच्या रायगड येथील रहिवासी असलेल्या २२ वर्षीय सोशल मीडिया इन्फ्लुएंसर लीना नागवंशी हिच्या आत्महत्येने सर्वांनाच धक्का बसला आहे. लीनाने हे का केले याचाही पोलीस तपास करत आहेत.

Leena Nagwanshi
Tunisha Sharma: तुनिषा अनंतात विलीन... मामांनी दिला मुखाग्नी

लीना सोशल मीडियावर खूप सक्रिय होती आणि तिचे फॉलोवर्सही खूप होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार लीनाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणाचा तपास चक्रधर नगर पोलीस ठाण्याचे पोलिस करत आहे. तिचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे.

Leena Nagwanshi
Tunisha Sharma: ' हा मूर्खपणा...तुनिषाच्या मृत्यूला तिचं कुटुंबच जबाबदार...' शक्तीमान भडकला

इंस्टाग्राम व्यतिरिक्त लीना यूट्यूबवर देखील खूप सक्रिय होती. युट्युबवरही तिच्या चाहत्यांची संख्या चांगलीच होती. तिने टाकलेले पोस्ट आणि फोटो पाहिल्यानंतर ती आत्महत्येसारखं मोठं पाऊल उचलू शकते याचा अंदाज बांधणे फार कठीण आहे. तिने मृत्यूच्या दोन दिवस आधीच सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली होती, ज्यामध्ये ती खुप आंनदी दिसली होती.

हेही वाचा : क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

तिचा हा व्हिडिओ ख्रिसमसच्या थीमवर होता. या व्हिडिओमध्ये लीनाने लाल रंगाचा शॉर्ट फ्रॉक घातला होता. त्याचवेळी तिच्या डोक्यावर लाल रंगाची ख्रिसमस कॅप दिसते. व्हिडिओमध्ये लीना एका बाळासोबत दिसत आहे. लीनाचे इंस्टाग्रामवर 10 हजारांहून अधिक फॉलोअर्स होते. तिचा प्रत्येक व्हिडिओ सोशल मीडियावर येताच व्हायरल होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com