कुणी म्हणतं हिरवे कुणी म्हणे निळे', ऐश्वर्यानं सांगितला डोळ्यांचा खरा रंग Aishwarya Rai-Bachchan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aishwarya Rai-Bachchan

'कुणी म्हणतं हिरवे कुणी म्हणे निळे', ऐश्वर्यानं सांगितला डोळ्यांचा खरा रंग

ऐश्वर्या राय(Aishwarya rai-Bachchan) यंदाच्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये(Cannes film festival 2022) पोहोचली आहे. आणि त्यामुळे पुन्हा एकदा तिच्या सौंदर्याच्या चर्चा रंगल्या आहेत. सगळ्यात अधिक तर तिच्या डोळ्यांचीच प्रशंसा केली जाते. एकदा अभिनेत्रीनं स्वतःच एका मुलाखतीत सांगितलं होतं की,लहानपणी डोळे आणि केसांमुळेच तिची सर्वाधिक प्रशंसा केली जायची. ऐश्वर्याच्या डोळ्यांमध्ये खास काहीतरी नक्कीच आहे.अगदी त्या संदर्भात माहिती मिळवण्यासाठी गूगलही सर्च केलं जातं. सिनेमात ती नेहमी त्या-त्या वेळच्या आवश्यकतेनुसार लेंस घालते अशी बातमी आहे.

हेही वाचा: Cannes 2022: गोल्डन-ब्लॅक साडीत हॉट दीपिकावर उपस्थितांच्या नजरा खिळल्या...

आता हे देखील कळत आहे की अनेकदा लोक ऐश्वर्याच्या डोळ्यांचा रंग नेमका कोणता याविषयी देखील माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतात. कितीतरी वेळेला तिचे डोळे निळेच आहेत असं वाटतं,कधी ते हिरवे असल्याचा देखील भास होतो तर कधी ते ग्रे आहेत असं वाटून जातं. पण एकदा ऐश्वर्यांनेच तिच्या डोळ्यांचा रंग नेमका कसा आहे याविषयी खुलासा केला होता.

हेही वाचा: 'सुशांत प्रकरणात सीबीआयनं मला खूप त्रास दिला...'; शेखर सुमनचा मोठा खुलासा

ऐश्वर्या राय-बच्चन खूप सुंदर आहे,हे सगळ्या जगाला आता माहित आहे. ती जेव्हा समोर असते तेव्हा तिच्यावरुन नजर हटतच नाही. असं कुणीच नसेल ज्याला ऐश्वर्याचे एका नजरेत घायाळ करणारे डोळे आवडले नसावेत. गुगलवर तिच्या डोळ्यांविषयी खूप माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. असं रीसर्चमध्ये लक्षात आलं आहे की,जगभरात ६००० इंटरनेट युजर्स दर महिन्याला ऐश्वर्याच्या डोळ्यांबाबतीत माहिती मिळवताना दिसतात.

हेही वाचा: लग्नासाठी कंगनाची दिल्लीच्या मुलाला पसंती?डेटिंगचे किस्से सांगत केला उलगडा

ऐश्वर्या रायनं एका मुलाखतीत आपल्या डोळ्यांच्या रंगांविषयी सांगितलं होतं. तिनं आपल्या डोळ्यांचा नेमका रंग कोणता हे त्या मुलाखतीत सांगताना ती म्हणाली होती,''ना निळा,ना हिरवा माझ्या डोळ्यांचा रंग नॅचरल ग्रीन आहे. आणि सुर्यप्रकाश किंवा कृत्रिम लाइट्समध्ये तो बदलेला दिसतो कधी-कधी. कधी त्यामुळे तो फक्त हिरवा किंवा निळादेखील दिसतो. पण माझ्या डोळ्यांचा रंग समुद्रासारखा ग्रीन-ग्रे आहे''. मादाम तुस्साड्च्या वॅक्स म्युझियममध्ये ऐश्वर्याच्या स्टॅच्युच्या डोळ्यांचा जो रंगआहे,तोच तिच्या डोळ्यांचा खरा रंग आहे.

त्याच मुलाखतीत ऐश्वर्यानं आपल्या डोळ्यांच्या रंगांसदर्भातला एक मजेदार किस्सा सांगितला होता. एकदा 'सरबजीत' सिनेमातील व्यक्तीरेखा साकारताना तिला तपकिरी रंगांचे लेन्सेस हवे होते. ऐश्वर्यानं एका डोळ्यात लेन्स घातला देखील आणि तेवढ्यात तिच्या डोळ्यांवर छोट्या आराध्याची म्हणजे तिच्या मुलीची नजर पडली. आणि तेव्हा लगेच आराध्यानं तिला 'ओ मिनियन' नावानं बोलावलं. माहितीसाठी सांगतो की 'ओ मिनियन' हे एक कार्टुनमधलं कॅरॅक्टर आहे,ज्याचा एक डोळा तपकिरी(ब्राऊन) आणि एक ग्रीन आहे.

Web Title: Aishwarya Rai Bachchan Reveals Her Eyes

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top