Aishwarya shouted on aaradhya bachchanसार्वजनिक ठिकाणी कसं वागायचं,चालायचं हे शिकवण्याच्या उद्देशाने ऐश्वर्याने तिला तसं चालण्याला नकार दिला.abhishek bachchan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aishwarya Rai-Bachchan,Aaradhya Bachchan

ऐश्वर्याने आराध्याला टोकले आणि म्हणाली,"शिस्तीत चाल"

ऐश्वर्या राय-बच्चन(Aishwarya Rai-Bachchan) ही केवळ उत्तम अभिनेत्रीच नाही तर एक चांगली सून,बायको आणि त्याहीपेक्षा अधिक ती जबाबदार आई आहे. आराध्याप्रतीचं तिचं प्रेम,काळजी ब-याचदा सार्वजनिक ठिकाणीही पाहायला मिळाली आहे. आराध्यासाठी तिने अनेक सिनेमे नाकारले ही गोष्टही लपून राहिलेली नाही. लॉकडाऊनच्या दरम्यान शुटिंगला जाताना ब-याच ठिकाणी ती आराध्याला सोबतही घेऊन गेली होती. ती तिच्यासाठी खूप 'ओव्हर प्रोटेक्टिव्ह' आहे असंही ब-याचदा म्हटलं जातं.

हेही वाचा: प्रशांत दामले म्हणाले,''या तर वाटाण्याच्या अक्षता!''

नुकताच आराध्याचा दहावा वाढदिवस साजरा करण्यासाठी ऐश्वर्या आणि अभिषेक तिला घेऊन मालदीवला गेले होते. तिथले धमाल फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर अनेकांनी त्यांच्यावर लाइक्सचा वर्षाव केला. मालदीवहून हे तिघे परतले तेव्हाचा एअरपोर्टवरचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. ज्या व्हिडीओत आपल्या लाडक्या आराध्याला ऐश्वर्या टोकताना दिसतेय. खरं तर आराध्या आईचा हात पकडून मस्त कॅटवॉक करताना दिसतेय. पण सार्वजनिक ठिकाणी कसं वागायचं,चालायचं या उद्देशाने ऐश्वर्याने तिला तसं चालण्यास नकार दिला.

हेही वाचा: आणि अमिताभ बच्चन यांची बोलती झाली बंद!

ऐश्वर्या मणिरत्नम यांच्या 'पोन्नियीन सेल्वन1' या सिनेमात लवकरच आपल्याला दिसणार आहे. तर दुसरीकडे अभिषेक बच्चनही 'बॉब बिस्वास' या सिनेमात एका वेगळ्या भूमिकेतून आपल्याला दिसणार आहे. या भूमिकेसाठी अभिषेकने आपले वजन तब्बल 100 ते 105 किलो केले होतेे.

loading image
go to top