Aishwarya Rai : 'कशी झालीस तू'? चक्क ऐश्वर्याला 'बॉडी शेमिंग'चा करावा लागला सामना! तिनंही नेटकऱ्यांना सुनावलं, 'तुम्हाला तर...'

गेल्या दोन दशकांहून अधिक ऐश्वर्यानं तिच्या नावाची वेगळी ओळख निर्माण केली आहे
Aishwarya Rai Trolled
Aishwarya Rai Trolledesakal

Aishwarya Rai PS 2 Actress Trolled Body Shaming : माजी विश्वसुंदरी आणि बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या रॉयचा काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात तिनं तिच्या भाचीसोबत नव्या नवेली नंदाबरोबर रॅम्प वॉक केला होता.त्यावर तिला आलेल्या प्रतिक्रिया मात्र वादाचा विषय ठरताना दिसत आहे.

गेल्या दोन दशकांहून अधिक ऐश्वर्यानं तिच्या नावाची वेगळी ओळख निर्माण केली आहे.ऐश्वर्याच्या नावाला बॉलीवूड, हॉलीवूड आणि दाक्षिणात्य चित्रपट विश्वामध्ये मोठा मान आहे. काही महिन्यांपूर्वी तिचा पीएस २ नावाचा चित्रपट येऊन गेला होता. त्या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली होती. प्रख्यात दिग्दर्शक मणिरत्नम यांच्या या चित्रपटानं प्रेक्षकांची वाहवा मिळवली होती.

नेटकऱ्यांना एखाद्या सेलिब्रेटीला ट्रोल करण्यासाठी कोणतंही कारण पुरतं. त्यात ऐश्वर्याला देखील अनेकांनी बॉडी शेमिंगवरुन ट्रोल केले आहे. ऐश्वर्या आता तू कशी झाली आहेस, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहे. तिनंही कुणाचं ऐकून न घेता सरळपणे ट्रोल करणाऱ्यांना सुनावले आहे. मी कशाप्रकारचे कपडे परिधान करावेत हे सांगणारे तुम्ही कोण, माझे आयुष्य मला हवे तसे जगण्याचा अधिकार नाही का, ही गोष्ट तुम्ही कधी लक्षात घेणार असा प्रश्नही ऐश्वर्यानं ट्रोल करणाऱ्यांना केला आहे.

ऐश्वर्यानं काही दिवसांपूर्वी त्या एका इव्हेंटमध्ये घेतलेला सहभाग हा वादाचे कारण ठरताना दिसतो आहे. यामध्ये सई मांजरेकर पासून तेजस्वी प्रकाशपर्यत अनेक सेलिब्रेटींनी सहभाग नोंदवला होता. त्यात सर्वाधिक चर्चा होती ती ऐश्वर्याची. ऐश्वर्याला तिच्या लूकवर ट्रोल व्हावे लागले आहे. काहींनी तिला तिच्या दिसण्यावरुन डिवचले आहे. हे काही ऐश्वर्याला सहन झालेले नाही.

पोनियन सेल्वनमध्ये आम्ही तुला ज्या रुपात पाहिले त्यापेक्षा तू खूपच वेगळी दिसते आहे. तू खूपच बदलली आहेस पहिली ऐश्वर्या कुठे गायब झाली हे कळत नाही. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. त्यावरुन ऐश्वर्यानं सणसणीतपणे नेटकऱ्यांना उत्तर दिले आहे.

Aishwarya Rai Trolled
Nana Patekar : नाना पाटेकरांच्या घरी ऋषी कपूर दारुची बाटली घेऊन गेले होते तेव्हा....! काय होता तो भन्नाट किस्सा?

ऐश्वर्याच्या प्रोजेक्टविषयी सांगायचे झाल्यास, तिनं तिच्या आगामी चित्रपटांविषयी काहीही सांगितलेले नाही. ती शेवटी मणिरत्नम यांच्या पोनियन सेल्वनमध्ये दिसली होती. त्यात तिनं नंदिनीची भूमिका साकारली होती. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com