अजय देवगणने मानले योगी आदित्यनाथ यांचे आभार!

टीम ईसकाळ
मंगळवार, 14 जानेवारी 2020

तानाजींची प्रमुख भूमिका केलेला अभिनेता अजय देवगण याने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आभार मानले आहेत. ट्विट करत त्याने योगी आदित्यनाथ यांना धन्यवाद व्यक्त केले आहेत.

लखनौ : महाराष्ट्रातली पराक्रमी सरदार नरवीर तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारीत 'तान्हाजी : द अनसंग वॉरियर' हा चित्रपट उत्तर प्रदेशात टॅक्स फ्री करण्यात आला. यामुळे तानाजींची प्रमुख भूमिका केलेला अभिनेता अजय देवगण याने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आभार मानले आहेत. ट्विट करत त्याने योगी आदित्यनाथ यांना धन्यवाद व्यक्त केले आहेत.

भाजपची सत्ता असलेल्या 'या' राज्यात 'तान्हाजी' टॅक्स फ्री? महाराष्ट्रात कधी?

महाराष्ट्राच्या मातीतले शिवाजी महाराजांचे शूर सरदार तानाजी मालुसरेंनी कोंढाणा किल्ला जिंकत आपले बलिदान दिले. त्यांची ही शौर्यगाथा देशातल्या लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी दिग्दर्शक ओम राऊत आणि अजय देवगण यांनी मिळून 'तान्हाजी : द अनसंग वॉरियर'ची निर्मिती केली. हा चित्रपट उत्तर प्रदेशातील योगी सरकारने टॅक्स फ्री केला आहे. त्यामुळे अभिनेता व निर्माता अजय देवगण यांने योगींचे आभार मानले आहेत. 'तानाजी चित्रपट उत्तर प्रदेशात टॅक्स फ्री केल्याने योगी आदित्यनाथजी तुमचे खूप खूप आभार. तुम्हीही हा चित्रपट बघितल्यास आम्हाला खूप आनंद होईल.' असे ट्विट अजयने केले आहे. 

कोंढाणा किल्ला जिंकताना धारातीर्थी पडलेल्या तानाजी यांच्याबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांनी गड आला पण सिंह गेला असे म्हटले होते. त्यानंतर, कोंढाणा या किल्ल्यास सिंहगड असे नाव देण्यात आले. ही सर्व कथा मोठ्या पडद्यावर मांडण्यात आली आहे. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्याच्या भूमीत तानाजी मालुसरेंनी हा पराक्रम गाजवला होता. म्हणून, अजय देवगणची भूमिका असलेला तानाजी चित्रपट महाराष्ट्रात टॅक्स फ्री करा, अशी मागणी होत असताना हा चित्रपट अजूनही महाराष्ट्रात टॅक्स फ्री करण्यात आलेला नाही.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दरम्यान, अजय देवगन, सैफ अली खान आणि काजोल अभिनीत हा तान्हाजी हा सिनेमा असून दीपिका पादुकोण अभिनीत छपाक हा सिनेमा सध्या थिएटरमध्ये झळकत आहे. दोन्ही सिनेमांनी आतापर्यंत चांगली कमाई केली असली तरी यात तान्हाजीने कमाईच्या बाबतीत छपाकला मागे टाकले आहे. तान्हाजी चित्रपटाने चार दिवसात 73 कोटींची कमाई केली आहे. तर, छपाकने बॉक्स ऑफिसवर केवळ 19.02 कोटी रुपये कमावले आहेत. तान्हाजी आणि छपाक चित्रपटावरुन देशात चांगलेच राजकारण तापले आहे. काँग्रेससह डाव्या पक्षांकडून छपाकला समर्थन देण्यात येत आहे, तर भाजपाकडून तान्हाजी चित्रपटाला पाठिंबा मिळत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ajay Devgan says thank ypu to UP PM Yogi Adityanath for making tanhaji tax free