'थॅंक गॉड' मुळे अजय,सिद्धार्थ विरोधात कोर्टात केस दाखल, चित्रगुप्ताचा अपमान भोवला...

अजय देवगण आणि सिद्धार्थ मल्होत्राच्या 'थॅंक गॉड' सिनेमा विरोधात सोशल मीडियावर गेल्या अनेक दिवसांपासून बॉयकॉट ट्रेन्ड सुरू आहे.
Ajay Devgan,Sidharth Malhotra 'Thank God' Movie in legal trouble.
Ajay Devgan,Sidharth Malhotra 'Thank God' Movie in legal trouble.Google
Updated on

Thank God In Legal Trouble: अजय देवगण आणि सिद्धार्थ मल्होत्रा अभिनित 'थॅंक गॉड' सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. चाहत्यांनी सिनेमाच्या ट्रेलरला पसंतीची पावती दिलीच होती,इतक्यात ट्रोल आर्मीनं ट्वीटरवर 'बॉयकॉट थॅंक गॉड' म्हणायला सुरुवात केली. आणि अखेर ट्वीटरवर जोरदार Bदycott Thank God ट्रेंड सुरू झाला. सिनेमात देवाचा अपमान करण्यात आल्याच्या मुद्द्यावरनं हा बॉयकॉट ट्रेंड सुरु झाला आहे. यादरम्यान आता अजय देवगण,सिद्धार्थ मल्होत्रा आणि थॅंक गॉड सिनेमाचे दिग्दर्शक इंदर कुमार यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.(Ajay Devgan,Sidharth Malhotra 'Thank God' Movie in legal trouble.)

Ajay Devgan,Sidharth Malhotra 'Thank God' Movie in legal trouble.
प्रियंकाचे शॉकिंग खुलासे...

या तिघांविरोधात धार्मिक भावना दुखावल्याचं कारण सांगत केस दाखल केली गेली आहे. वकील हिमांशु श्रीवास्तव यांनी उत्तर प्रदेशच्या जौनपूर कोर्टात अजय देवगण,सिद्धार्थ मल्होत्रा आणि इंदर कुमार यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणात हिमांशु श्रीवास्तव यांची साक्ष १८ नोव्हेंबर रोजी रेकॉर्ड केली जाईल.

थॅंक गॉड सिनेमात अजय देवगण चित्रगुप्त बनला आहे,जो पाप-पुण्याचं मोजमाप करतो. ट्रेलर मध्ये खूप कमी कपडे घातलेल्या मुली चित्रगुप्त बनलेल्या अजयच्या पाठीमागे उभ्या दिसत आहेत. आणि नेमकं यावरच लोक भडकलेयत. सोशल मीडियावर या सिनेमा विरोधात राग व्यक्त करताना लोक म्हणताना दिसत आहेत की, 'सिनेमात देवाचा अपमान करण्यात आला आहे'. वकील हिमांशु श्रीवास्तव यांनी या संबंधित प्रकरणात मेकर्स आणि अभिनेत्यांना अडकवत त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.

Ajay Devgan,Sidharth Malhotra 'Thank God' Movie in legal trouble.
Alia Bhatt चे डोहाळे जेवण,सोहोळ्यासाठी नीतू कपूर यांची खास अट चर्चेत...

कोर्टात दाखल केल्या गेलेल्या याचिकेत म्हटलं आहे की,'अजय देवगण,चित्रगुप्त बनला आहे. एका सीनमध्ये तो विनोद करताना देवाचा अपमान होईल अशी भाषा वापरताना दिसत आहे. याचिकाकर्त्याचं म्हणणं आहे की,चित्रगुप्ताला कर्मदेवता म्हणून संबोधलं जातं. तो माणसाच्या चांगल्या-वाईट कर्मांचा हिशोब ठेवतो. पण ट्रेलरमध्ये जे काही दाखवलं आहे त्यानं धार्मिक भावना दुखावण्याचा संभव आहे,ज्यामुळे परिस्थिती गंभीर बनू शकते'. थॅंक गॉड मध्ये अजय देवगण आणि सिद्धार्थ मल्होत्रा व्यतिरिक्त नोरा फतेही देखील आहे. हा सिनेमा २४ ऑक्टोबर,२०२२ रोजी रिलीज होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com