Alia Bhatt चे डोहाळे जेवण,सोहोळ्यासाठी नीतू कपूर यांची खास अट चर्चेत... Alia Bhatt Baby Shower | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Alia Bhatt Baby Shower confirm, Soni Razdan, Neetu Kapoor Are Host

Alia Bhatt चे डोहाळे जेवण,सोहोळ्यासाठी नीतू कपूर यांची खास अट चर्चेत...

Alia Bhatt Baby Shower: आलिया भट्ट सध्या 'ब्रह्मास्त्र'चं यश एन्जॉय करत आहे. काही महिने आधीच तिनं आपल्या प्रेग्नेंसीविषयी सोशल मीडियावर हटके पोस्टच्या माध्यामातून सांगितले होते. आता बातमी कानावर पडतेय की आलियाची आई सोनी राजदान आणि सासू नीतू कपूर लवकरच आलियाच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आयोजित करणार आहेत. या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात म्हणे फक्त मुलींना निमंत्रण असणार आहे. तशी आलियाच्या सासूबाईंचीच म्हणे अट आहे. (Alia Bhatt Baby Shower confirm, Soni Razdan, Neetu Kapoor Are Host)

हेही वाचा: तेजस्वी प्रकाश...'तू तर हॅंगर दिसतेस'

आलिया सध्या प्रेग्नेंसीच्या तिसऱ्या टप्प्यात आहे,म्हणजेच डिलिव्हरीचा काळ जवळ येत आहे. म्हणूनच अभिनेत्रीची आई सोनी राजदान आणि सासू नीतू कपूर यांनी तिच्यासाठी खास प्लॅन आखला आहे. कार्यक्रमाची जी बातमी समोर येतेय त्यानुसार फक्त मुलींना आलियाच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात सामिल होता येणार आहे. आणि फर्मान नीतू कपूर यांनी सोडला आहे,असं देखील कळतंय. आलियानं जून महिन्यात सोनोग्राफी करतानाचा एक फोटो शेअर करत आपल्या प्रेग्नेंसीची घोषणा केली होती.

हेही वाचा: I am sorry ऋषभ पंत',उर्वशीचा क्रिकेटरला मेसेज

सप्टेंबरच्या शेवटच्या महिन्यात आलियाच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम असू शकतो. या कार्यक्रमात शाहिन भट्ट,करिना कपूर खान,करिश्मा कपूर,आकांक्षा रंजन,नव्या नंदा, श्वेता बच्चन,आरती शेट्टी आणि आलिया भट्टची गर्ल गॅंग म्हणजेच लहानपणीच्या मैत्रिणी या सगळ्या तर कन्फर्म असणार यात शंकाच नाही. हे डोहाळे जेवण मुंबईत बान्द्रा इथे होणार आहे. गेल्या महिन्यात आलिया भट्ट आणि रणबीर कपूर 'बेबीमून' सेलिब्रेट करण्यासाठी म्हणे इटलीला गेले होते.

हेही वाचा: प्राजक्ताची गूड न्यूज; म्हणाली,'मंगल बेला आई'

ब्रह्मास्त्रचा दिग्दर्शक अयान मुखर्जीनं एका मुलाखतीत सिनेमाच्या दुसऱ्या भागाच्या रिलीज डेट संबंधी सांगताना म्हटलं होतं की,''ब्रह्मास्त्र पार्ट २ रिलीज करण्यासाठी मी डिसेंबर २०२५ चं टार्गेट ठेवलं आहे. या सिनेमासाठी आम्ही काही गोष्टी निश्चित केल्या आहेत,ज्या तशाच पार पडतील. सिनेमाला तयार करून पुढील ३ वर्षात तो रिलीज करण्याचा आमचा प्लॅन आहे. खरंतर हे खूप कठीण असणार आहे''. हो,पण अद्याप अयानने सिनेमाची रिलीज डेट सांगितलेली नाही.

आता आलियाच्या सिनेमांविषयी बोलायचं झालं तर सध्या तिचा 'ब्रह्मास्त्र' चांगली कमाई करताना दिसतोय. तर लवकरच ती रणवीर सिंग सोबत 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' सिनेमात दिसणार आहे.

Web Title: Alia Bhatt Baby Shower Confirm Soni Razdan Neetu Kapoor Are Host

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..