esakal | 'सध्याच्या चितेंच्या वातावरणात हेच क्षण..'; मुलीच्या वाढदिवसानिमित्त अजय देवगण भावूक

बोलून बातमी शोधा

Ajay Devgn with daughter Nyasa
'सध्याच्या चितेंच्या वातावरणात हेच क्षण..'; मुलीच्या वाढदिवसानिमित्त अजय देवगण भावूक
sakal_logo
By
टीम ई सकाळ

बॉलिवूड अभिनेता अजय देवगण सोशल मीडियावर सक्रिय असतो. त्याच्या कुटुंबाचे फोटो तो शेअर करतो. आज अजयची मुलगी न्यासाचा वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त अजयने सोशल मीडियावर एक खास पोस्ट लिहिली आहे. न्यासाच्या अठराव्या वाढदिवसानिमित्त अजयने तिच्यासोबतचा एक खास फोटो पोस्ट करून त्याला कॅप्शन दिले, ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा न्यासा. सध्या सुरू असलेल्या कठीण वेळी असा छोटा आनंद सर्व ताण दूर करतो. त्याचप्रमाणे ज्यांना प्रार्थनेची सर्वाधिक गरज आहे त्यांच्यासाठी मी मनापासून प्रार्थना करतो.’ कोरोनाचा वाढत्या संसर्गामुळे सर्वांनाच अत्यंत कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. अशा वेळी अजयने त्याच्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त सर्वांसाठी प्रार्थना केली आहे.

काजोलनेदेखील न्यासाच्या लहाणपणीचा फोटो शेअर करून तिला शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोमध्ये न्यासा खूप गोड दिसत आहे. फोटोच्या कॅप्शनमध्ये काजोलने लिहिले, ‘तू जन्माला आलीस तेव्हा मी खूप अस्वस्थ होते. माझ्या आयुष्यातील ती खूप कठिण परीक्षा होती. तुझा जन्म झाल्यानंतर मी वर्षभर अस्थिर होते. तुझ्यासोबत असताना अनेकदा मी शिक्षक म्हणून वावरले तर काही वेळा विद्यार्थी होऊन तुझ्याकडून खूप गोष्टी शिकल्या. आता तू स्वतंत्र झाली आहेस आणि कोणासाठीही तुझ्या चमकत्या व्यक्तिमत्त्वाचा रंग ढळू देऊ नकोस.’

हेही वाचा : 'लागीरं झालं जी' मालिकेतील 'शीतली'ला कोरोना

हेही वाचा : 'फुटबॉल झाली आहेस'; म्हणून हिणवणाऱ्याला धनश्री कडगावकरचं सडेतोड उत्तर

काजोलच्या पोस्टला एक लाखापेक्षा जास्त तर अजयच्या फोटोला दोन लाखांपेक्षा जास्त लाइक्स मिळालेत आहेत. अजयचे काजोलसोबत 24 फेब्रुवारी 1999 रोजी लग्न झाले. त्यानंतर 20 एप्रिल 2003 रोजी न्यासाचा जन्म झाला. त्यानंतर काजोलने 2010 साली मुलाला जन्म दिला असून त्याचे नाव युग आहे.