जिवे मारण्याची धमकी अन् पाचव्या दिवशी मृत्यू! अर्ध्या रात्री आकांक्षाला शेवटचा भेटलेला तो 'मिस्ट्री मॅन' कोण?

 Akanksha Dubey, Akanksha Dubey news, Akanksha Dubey suicide
Akanksha Dubey, Akanksha Dubey news, Akanksha Dubey suicideEsakal

भोजपुरी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आकांक्षा दुबे हिच्या आत्महत्येने सर्वांनाच धक्का बसला आहे . तिच्या आत्महत्याप्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे होत आहे.

या प्रकरणी आकांक्षाचा कथित प्रियकर समर सिंह आणि त्याचा भाऊ संजय सिंह यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा सिंहच्या आत्महत्येप्रकरणी तिची आई मधु दुबे यांनी गायक समर सिंह आणि त्याचा भाऊ संजय सिंह यांच्याविरोधात वाराणसीच्या सारनाथ पोलिस ठाण्यात ही तक्रार दाखल केली. त्याचबरोबरच त्यांनी आणखीही अनेक मोठे आरोप केले आहेत.

 Akanksha Dubey, Akanksha Dubey news, Akanksha Dubey suicide
Ruchismita Guru: इंडस्ट्री पुन्हा हादरली! अभिनेत्रीचा नातेवाईकाच्या घरी संशयास्पद मृत्यू..

मीडियाशी बोलताना आकांक्षाच्या आईने सांगितले की, समर सिंह तिच्या मुलीवर तीन वर्षांपासून अत्याचार करत होता. तिच्या आईने समरने आकांक्षाला धमकावल्याचा आरोपही केला आहे.

ती म्हणाली, "21 तारखेला समर सिंहने माझ्या मुलीला 'मी तुला गायब करुन टाकेल, मी तुला मारून टाकीन, तू मला ओळखत नाहीस' अशा अनेक धमक्या दिल्या होत्या. 22 रोजी माझी मुलगी बनारसला आली आणि त्या लोकांनी तिची हत्या केली. असा आरोप तिच्या आईने दोघांवर केला आहे.

 Akanksha Dubey, Akanksha Dubey news, Akanksha Dubey suicide
Maidan Ajay Devgan: 'भोला' रिलीज झाल्यावर अजय देवगण 'मैदान' गाजवणार, आगामी सिनेमाची शानदार घोषणा

त्याचबरोबर आकांक्षाच्या आईने समर सिंहवर आपल्या मुलीचे पैसे थकवल्याचा आरोपही केला आहे. आकांक्षा ही समर सिंह यांच्यासोबत तीन वर्षांपासून काम करत होती.

त्यांनी अनेक अल्बममध्ये एकत्र काम केलं होतं. त्याच्याकडे आकांक्षाचे सुमारे 2 ते 3 कोटी रुपये देणे बाकी होते आणि तो ते पैसे परत करण्यास नकार देत होता असा आरोपही आकांक्षाच्या आईने केला आहे.

 Akanksha Dubey, Akanksha Dubey news, Akanksha Dubey suicide
Priyanka Chopra: देसी गर्लनं पुन्हा केली कमाल! बनली 'अकादमी ऑफ मोशन पिक्चर'ची सदस्य

पोलिस या प्रकरणाचा शोध घेत असून तिच्या आत्महत्येच्या रात्री एक व्यक्ती आकांक्षाला सोडण्यासाठी आली होती. आकांक्षा अडखळत असताना तो तिला खोलीत घेऊन गेला आणि जवळपास 17 मिनिटे तिच्यासोबत खोलीत राहिला.

अशा परिस्थितीत आकांक्षाला सोडायला आलेली ती व्यक्ती कोण होती, असे प्रश्न उपस्थित केले जात होते. आता त्या व्यक्तीचा शोध पोलिसांनी घेतला असून तो व्यक्ती वाराणसीचा असून तो लंका पोलीस स्टेशन परिसरातील टिकरी येथे राहतो.

त्या व्यक्तीने पोलिसांना सांगितले की, आकांक्षा शनिवारी रात्री पांडेपूरमध्ये त्याला भेटली आणि तिनं लिफ्ट मागितली. म्हणूनच तो आकांक्षाला हॉटेलवर सोडायला गेला. आता पोलिस पुढील तपास करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com