Akshay Kumar : ...आणि अक्षय कुमारला रडू कोसळले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Akshay Kumar

Akshay Kumar : ...आणि अक्षय कुमारला रडू कोसळले

Akshay Kumar News : अक्षय कुमारचा चित्रपट रक्षाबंधन येत्या ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. तो चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पाहुणा म्हणून सुपरस्टार सिंगर सीझन-२ मध्ये पोहोचला. कार्यक्रमाचा प्रोमो सोनी टीव्ही ऑफिशयलच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. यात अक्षय कुमार रडताना दिसत आहे. कार्यक्रमाचा हा भाग रक्षाबंधन स्पेशल आहे. यात अक्षय कुमारला (Akshay Kumar) असे सरप्राईज मिळते जे त्याला भावूक करुन टाकते. कार्यक्रमाच्या प्रोमोत दाखवले गेले आहे,की अक्षय परीक्षकांच्या खुर्चीवर बसला आहे. (Akshay kumar become emotional after hearing sister audio clip)

हेही वाचा: 'मी अमिताभ किंवा शाहरुख नाही, भाकरीसाठी मला काम करावे लागते'

त्याला त्याची बहीण अलका भाटीयाचा आवाज ऐकू येतो. वास्तविक अलकाने त्याच्यासाठी रक्षाबंधन प्रसंगी ऑडिओ क्लिप पाठवली होती. ती ऐकून अक्षय कुमारला रडू कोसळते. बहीण म्हणते, तो नेहमी तिच्यासाठी उभा राहिला. एक भाऊ आपल्या बहिणींसाठी स्वतःचे लग्न थांबवतो, अशी मध्यवर्ती आशयावर रक्षाबंधन हा चित्रपट आधारित असून तो ११ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. (Entertainment News)

हेही वाचा: Aamir Khan : बाॅक्स ऑफिसवर बाॅलीवूडची कमाई होते कमी? आमिर खानने दिले उत्तर

प्रोमोत गायक ऋतुराज, किशोर कुमारचे गाणं 'फुलों का तारों का सबका कहना है' गात असतो. तेव्हाच मागून अक्षयची बहीण अलकाचा आवाज येतो. अलका पंजाबीत म्हणते प्रिय राजू काल बोलताना आठवले की ११ ऑगस्ट रोजी राखी पौर्णिमा आहे. माझ्या प्रत्येक सुख-दुःखात तू माझ्याबरोबर उभा होता. तू मित्र, भाऊ सर्वच भूमिका चांगल्या प्रकारे पार पाडल्या आहेत. सर्व गोष्टींसाठी आभारी आहे राजू !

Web Title: Akshay Kumar Become Emotional After Hearing Sister Audio Clip

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top