
Akshay Kumar ला बहिणीचा भावूक मेसेज, खिलाडी कुमार ढसाढसा रडला...
Akshay Kumar, 'Rakshabandhan': अभिनेता अक्षय कुमार(AKshay Kumar) सध्या आपल्या आगामी 'रक्षाबंधन' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये भलताच बिझी आहे. आपल्या या सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी बॉलीवूडचा हा खिलाडी कुमार आणि त्याची टीम रिअॅलिटी शो 'सुपरस्टार सिंगर २' मध्ये सामिल झाले होते. या शो च्या दरम्यान एक अशी गोष्ट घडली की अक्षय कुमारच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले,आणि त्याला ते आवरताही येईनात. अक्षय कुमार उपस्थित राहिलेला हा सुपरस्टार सिंगर २ चा एपिसोड शूट झाला आहे, जो वीकेन्डला म्हणजे शनिवार किंवा रविवारी प्रसारीत केला जाईल.(Akshay Kumar Cried After seen sister alka bhatia special message)
'सुपरस्टार सिंगर २' चा हा एपिसोड रक्षाबंधन स्पेशल एपिसोड असणार आहे. या खास दिवसाच्या निमित्ताने रक्षाबंधनची संपूर्ण टीम यावेळी उपस्थित राहिली होती. यावेळी सिनेमातील कलाकारांच्या भावा-बहिणींचे आलेले मेसेजस दाखवण्यात आले. त्यावेळी अक्षय कुमारची बहिण अलका भाटियानं आपल्या भावाला म्हणजे अक्षयला खास मेसेज पाठवला होता. ज्याला ऐकल्यावर बॉलीवूडचा खिलाडी कुमार भावूक झालेला दिसला. अक्षयच्या डोळ्यातून अश्रू वाहताना सर्वांनीच पाहिले.
त्यावेळी बॅकग्राऊंडला एक गाणे देखील वाजत आहे,'फूलों का तारों का सबका कहना है...' यामध्येच तिथल्या स्क्रीनवर अक्षय कुमार आणि त्याची बहिण अलका भाटियाचे काही फोटोज दाखवले गेले. आणि मध्येच अक्षयच्या बहिणीचा,अलका भाटियाचा आवाज कानावर पडला- ''प्रिय राजू, काल बोलता-बोलता लक्षात आलं की ११ ऑगस्टला रक्षाबंधन आहे. माझ्या प्रत्येक सुख-दुःखात तू माझ्या सोबत उभा राहिलास. मित्र,भाऊ,वडील अशा सगळ्या भूमिका निभावल्यास तू राजा. प्रत्येक गोष्टीसाठी तुझे धन्यवाद''.
जेव्हा अलका भाटियाचा मेसेज स्क्रीनवर सुरु होता,त्यावेळी अक्षय कुमारला आपले अश्रू आवरणं कठीण झालं. जसा अलकाचा मेसेज संपला तसं लागलीच अक्षय कुमार आपल्या बहिणीसोबतच्या जुन्या आठवणीत रमला. त्याने प्रेक्षकांसोबत त्या साऱ्या आठवणी शेअर केल्या. आपल्या बहिणीला 'देवी' हाक मारत अक्षय कुमार म्हणाला,''एका छोट्याशा घरात आम्ही राहत होतो. या देवीच्या जन्मानंतर आमचं आयुष्य बदलून गेलं. बहिणीच्या नात्यापेक्षा कोणतेच नाते मोठे नाही''.
सध्या अक्षय कुमारच्या र'क्षाबंधन' सिनेमाविषयी बोलायचं झालं तर १५ ऑगस्टला हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. हा सिनेमा आनंद एल रायनं दिग्दर्शित केला आहे. अक्षय कुमार व्यतिरिक्त सिनेमात भूमी पेडणेकरही महत्त्वाच्या भूमिकेत आहे. हा सिनेमा भाऊ आणि चार बहिणींमधील प्रेमळ नात्यावर आधारित आहे.