Laal Singh Chaddha साठी करिना नव्हती पहिली पसंत,आमिरला हवी होती 25 वर्षीय..

करणच्या 'कॉफी विथ करण 7' या शो मध्ये आमिर खाननं लाल सिंग चड्ढाविषयीचे अनेक सीक्रेट्स शेअर करत धम्माल आणली आहे.
Kareena Kapoor Was not a first choice for Laal Singh Chaddha,- Aamir khan
Kareena Kapoor Was not a first choice for Laal Singh Chaddha,- Aamir khanGoogle

Koffee With Karan: गेल्या काही दिवसांपासून आमिर खान(Aamir Khan) आणि करिना कपूर(Kareena Kapoor) आपल्या 'लाल सिंग चड्ढा'(Laal singh chaddha) सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहेत. करणच्या कॉफी विथ करण या शो मध्ये येऊन देखील दोघांनी चांगलीच धमाल केलेली दिसून आली. आमिर आणि करिनाचा या शो संदर्भातला प्रोमो पाहून अनेकांना हा अंदाज आलाच असेल. आता आम्ही तुम्हाला ते गुपित सांगणार जे कदाचित खूप कमी जणांना माहित असेल. करणच्या शो मध्ये आमिरनं करिना कपूरविषयी एक शॉकिंग गोष्ट शेअर केली आहे. बॉलीवूडच्या परफेक्शनिस्टने म्हटलं आहे की, लाल सिंग चड्ढा साठी करिना कपूर पहिली पसंत नव्हतीच मुळी.(Kareena Kapoor Was not a first choice for Laal Singh Chaddha,- Aamir khan)

Kareena Kapoor Was not a first choice for Laal Singh Chaddha,- Aamir khan
Koffee With Karan7: सेक्स लाईफ आणि प्रेग्नेंसीविषयी कतरिना करणार खुलासा

कोणी कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी करण जोहरला सेलिब्रिटींच्या मनातलं कसं काढून घ्यायचं हे अगदी बरोबर माहित आहे. तो यातला उस्ताद आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. कॉफी विथ करण मध्ये आलेल्या आमिर खानकडूनही त्यानं अशी अनेक सीक्रेट्स काढून घेतली आहेत. शो मध्ये करण आमिरला विचारतो, 'लाल सिंग चड्ढा'साठी करिना तुझी पहिली पसंत होती?' त्याचं उत्तर देताना आमिर म्हणाला, 'नाही'.

Kareena Kapoor Was not a first choice for Laal Singh Chaddha,- Aamir khan
Kishore Kumar यांना एक 'नकार' पडलेला महागात, इंदिरा गांधींनी अशी दिलेली सजा

याचं कारण सांगताना आमिर म्हणतो,'' या सिनेमासाठी २५ वय असलेल्या अभिनेत्रीच्या शोधात आम्ही होतो. कारण सिनेमात १८ ते ५० वयोगटाचा प्रवास दाखवायचा होता''. हेच कारण होतं की आमिरला सिनेमात करिनाला घ्यायचं नव्हतं. त्यानंतर सिनेमाच्या कास्टिंग डायरेक्टरच्या नजरेला करिनाचा एक व्हिडीओ पडला. आमिरने तो व्हिडीओ पाहिला आणि त्यानं मानलं की या सिनेमासाठी करिनाशिवाय दुसरं कुणी बेस्ट असूच शकत नाही. यानंतर आमिरने तो वयाचा मुद्दा बाजूला सारत करिनाची लाल सिंग चड्ढासाठी निवड केली.

लाल सिंग चड्ढा रक्षाबंधनच्या दिवशी म्हणजेच ११ ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे. सोशल मीडियावर आमिर खानचा सिनेमा बॉयकॉट करण्याची मागणी जोर धरून आहे. पण आमिरनं लोकांना सिनेमा पाहण्याचं आवाहन केलं आहे. आता आमिर पाठोपाठ अक्षयचा 'रक्षाबंधन' आणि आलियाचा 'डार्लिंग्स' सिनेमा देखील बॉयकॉट करण्याची मागणी केली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com