Shahrukh चा 200 करोडचा आलिशान 'मन्नत' आज सलमानच्या मालकीचा असता, पण...Salman Khan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Salman Khan reveals he turned down offer to buy Mannat before shahrukh

Shahrukh चा 200 करोडचा आलिशान 'मन्नत' आज सलमानच्या मालकीचा असता, पण...

Bollywood बॉलीवूडचे दोन प्रसिद्ध खान शाहरुख(Shahrukh Khan) आणि सलमान खान(Salman Khan) सगळ्यांचेच फेव्हरेट आहेत. दोघांचे चाहते नेहमीच त्यांच्याबद्दल ऐकण्यास उत्सुक असतात. तसं पाहिलं तर दोन्ही अभिनेत्यांचं आयुष्य सर्वांसमोर ओपन आहे. पण तरीदेखील अशा कितीतरी गोष्टी आहेत,ज्या लोकांना ऐकण्यास नक्कीच आवडतील. चाहते यांची श्रीमंती, त्यांची प्रॉपर्टी अशा कितीतरी गोष्टींची माहिती मिळवताना दिसतात. आता शाहरुखच्या बाबतीत म्हटलं तर त्याचा मन्नत बंगला मुंबईतीलच काय, देशाच्या कानाकोपऱ्यातून मुंबई फिरायला येणाऱ्या प्रत्येकाचं आकर्षण.पण तुम्हाला माहित आहे का हा बंगला पहिला सलमानला ऑफर झाला होता,पण त्यानं त्या ऑफरला सपशेल नकार कळवला होता.(Salman Khan reveals he turned down offer to buy Mannat before shahrukh)

बान्द्रा येथे निळ्या अथांग समुद्रासमोरील शाहरुख खानचा मन्नत बंगला अभिनेत्याच्या चाहत्यांसाठीच नाही तर सगळ्यांसाठी खरंतर एक टुरिस्ट पॉइंट आहे. वाढदिवस असो वा ईद, शाहरुख आपल्या बालकणीत येऊन चाहत्यांना हात हालवून अभिवादन करताना दिसतोच. काही दिवसांपूर्वीच एका कार्यक्रमा दरम्यान शाहरुखचा शेजारी सलमान खाननं खुलासा केला होता की, खूप वर्षांपूर्वी मन्नत बंगला खरेदी करण्याची ऑफर त्याला गेली होती,पण त्यानं त्यास नकार कळवला होता. आता शाहरुख खान याचा मालक आहे.

सलमान खानने एका न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे की, मला खूप वर्षांपूर्वी मन्नतला खरेदी करण्याची ऑफर मिळाली होती. तेव्हा इंडस्ट्रीत त्याचा प्रवास बऱ्यापैकी सुरू झाला होता आणि त्याचे वडील सलीम खान यांनी विचार केला की,सलमान इतक्या मोठ्या घराचं काय करणार. तेव्हा मग सलमाननं ती ऑफर स्विकारली नाही. आणि मग शाहरुख खाननं मन्नतला आपल्या मालकीचं केलं. सलमानने म्हणे एका पत्रकाराला असं देखील म्हटलं की, त्याला शाहरुखला विचारायचं आहे की तो इतक्या मोठ्या घरात काय करतो?

मन्नतच्या प्रेशद्वारापाशी खूप मोकळी जागा आहे. तब्बल सहा मजली हा बंगला आहे, गौरी खान स्वतः इंटेरिअर डिझाईनर असल्याकारणानं अर्थातच तिन घराला आतून खूप छान पद्धतीनं डेकोरेट केलं आहे. बोललं जातं की, मन्नतची सध्याची मार्केटमधील किंमत जवळपास २०० करोडच्या घरात आहे. शाहरुख खानही आपल्या बंगल्यात मोठ मोठ्या जंगी पार्ट्या आयोजित करण्यासाठी फेमस आहे.

सलमान-शाहरुखच्या सिनेमांविषयी बोलायचं झालं तर दोघेही लवकरच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. सलमानने शाहरुखच्या 'पठाण' सिनेमात कॅमियो साकारला आहे. बोललं जात आहे की, बॉलीवूडच्या मोठ्या अॅक्शनपटात दोघांना एकत्र पाहिलं जाऊ शकतं. पण सध्या त्यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती हाती लागलेली नाही.