अक्षय कुमारची आई आयसीयूमध्ये दाखल

आईला भेटण्यासाठी अक्षय कुमार युकेहून परतला.
akshay kumar
akshay kumarfile image

अभिनेता अक्षय कुमारची Akshay Kumar आई अरुणा बाटिया Aruna Bhatia यांना मुंबईतील हिरानंदानी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आईची प्रकृती ठीक नसल्याने अक्षय कुमार सोमवारी पहाटे युकेहून मुंबईला परतला आहे. गेल्या काही दिवसांपासून अरुणा यांची तब्येत बरी नसून त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. 'हिंदुस्तान टाइम्स'ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

"आईची तब्येत बरी नसल्याने अक्षयने तातडीने युकेहून परतण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी चित्रपटाच्या शूटिंगनिमित्त तो युकेमध्ये होता. गेल्या काही आठवड्यांपासून तो चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे", अशी माहिती 'हिंदुस्तान टाइम्स'ने दिली. अक्षय आगामी 'सिंड्रेला' या चित्रपटाच्या शूटिंगसाठी युकेला गेला होता. सोमवारी पहाटे तो मुंबईला परतला आहे.

akshay kumar
'मला एकट्यात लांब कुठेतरी दफन करा'; सिद्धार्थच्या अंत्यविधीनंतर करण पटेलची पोस्ट

चित्रपटाचं शूटिंग अर्ध्यावर सोडल्यानंतर अक्षयने निर्मात्यांना त्याची आवश्यकता नसलेल्या दृश्यांसाठी शूटिंग चालू ठेवण्यास सांगितलं आहे. खासगी समस्या असल्या तरी कामावर परिणाम होऊ नये याची काळजी त्याने घेतली आहे.

अरुणा भाटिया या ७७ वर्षांच्या आहेत. काही वर्षांपूर्वीच त्यांच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. अरुणा या निर्माती असून त्यांनी बॉलिवूडच्या काही चित्रपटांची निर्मिती केली आहे. यामध्ये 'हॉलिडे', 'रुस्तम' या चित्रपटांचा समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com