अन् अक्षय कुमारला 'त्या' गोष्टीची खूप लाज वाटली!

Akshay Kumar get ashamed of one thing at National Awards
Akshay Kumar get ashamed of one thing at National Awards
Updated on

मुंबई : अक्षय कुमार हल्ली सारखाच चर्चेत असतो. मग ते भाजप सरकार समर्थनार्थ केलेलं ट्विट असो किंवा अमित शहांची घेतलेली मुलाखत असो. पुन्हा एकदा चर्चेत तो चर्चेत आलाय ते एका वेगळ्या कारणामुळे. खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्याने एक रहस्य उलगडले आहे. तो ज्या क्षणी अपमानित झाला, तो क्षण त्याने या कार्यक्रमात सर्वांसमोर सांगितला.

जेव्हा अक्षय कुमार प्रसिद्धीच्या झोतात होता, तेव्हा त्याला पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. हा राष्ट्रीय पुरस्कार स्विकारतानाचाच तो अपमानास्पद क्षण होता. त्या क्षणी तो अत्यंत खजील झाला होता. पुरस्कार वितरणावेळी अक्षयसोबत एक मुलगी बसली होती. या मुलीमुळेच त्याला खजिल व्हायला झाले होते. काय केलं त्या मुलीने असं की अक्षयला अपमानित झाल्यासरखे वाटले?

राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यावेळी अक्षयसोबत एक मल्याळम अभिनेत्री बसली होती. तिने अक्षयकडे बघून स्मितहास्य केलं व त्याला म्हणाली, सर मी तुमची खूप मोठी चाहती आहे. मी तुमचे अनेक चित्रपट बघितले आहेत. त्यावेळी अक्षयला खूप बरं वाटलं आणि आपल्या कामाचा अभिमान वाटला. त्यानंतर त्या अभिनेत्रीने त्याला विचारलं की, तुम्ही किती चित्रपटांत काम केलंय, त्यावर अक्षयने 135 असे उत्तर दिले. 

यानंतर अक्षयनेही तिला तिच्या कामाविषयी विचारले, तर जो पुरस्कार स्विकारण्यासाठी ती आली होती, तो तिचा पहिला चित्रपट असल्याचे तिने सांगितले. यावेळी मात्र अक्षयला शरमल्यासारखे झाले. तिने एकच चित्रपट केला आणि तिला पहिल्याच चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. तो म्हणाला, हे ऐकल्यानंतर माझीच मला लाज वाटली. हा क्षण माझ्यासाठी फार अपमानास्पद होता, असं तो सांगतो.

याच कार्यक्रमानंतर अक्षयने अमित शहांची मुलाखत घेतली होती व त्यांना सूर्यास्तानंतर न जेवण्याचा सल्ला दिला होता. कारण फीट राहायचे असेल तर सूर्यास्तापूर्वी जेवण करणे गरजेचे असते. अमित शहा हे देशाचे मुख्य व्यक्ती आहेत व त्यांनी तंदुरूस्त राहणे गरजेचे आहे, असे अक्षयने सांगितले.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com