Boycott Laal Singh Chaddha: अक्षयची मोठी प्रतिक्रिया, 'तुम्ही जर...' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Boycott Laal Singh Chaddha

Boycott Laal Singh Chaddha: अक्षयची मोठी प्रतिक्रिया, 'तुम्ही जर...'

Boycott Rakshabandhan And Laal Singh Chaddha: बॉलीवूडमध्ये काही दिवसांपासून वेगळाच ट्रेंड सुरु असल्याचे दिसून येत आहे. आमिर खानच्या लाल सिंग चढ्ढावर बहिष्कार घालण्याची मागणी होत असताना बॉलीवूडचा खिलाडी (Aamir Khan) अक्षय कुमारच्या रक्षाबंधनवर देखील नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे या दोन्ही सेलिब्रेटींनी त्यावर प्रतिक्रियाही दिल्या आहे. (Akshay Kumar) प्रेक्षकांना जुने वाद विसरुन चित्रपट पाहण्याचे आवाहनही केले आहे. सोशल मीडियावर नेटकरी आमिर आणि अक्षयच्या चित्रपटांवर बहिष्कार घालण्याची मागणी करु लागले आहे. हे चित्रपट न पाहण्यासंबंधीच्या टोकदार (Bollywood Movies) प्रतिक्रिया व्हायरल झाल्या आहे. यासगळ्यावर पुन्हा एकदा अक्षयनं मोठी प्रतिक्रिया देऊन नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

प्रेक्षकांनी बहिष्काराच्या प्रकरणात जास्त पडू नये. कारण भारतात चित्रपट व्यवसाय हा जास्त महत्वाचा आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत चित्रपटांचा वाटा महत्वाचा आहे. त्यामुळे आपण त्याचाही गांभीर्यानं विचार करावा. अक्षयनं यावेळी लाल सिंग चढ्ढावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यात तो म्हणतो, तुम्हाला जर एखादा चित्रपट पाहायचा नाही तर तुम्ही तो पाहू नका. आपल्याकडे प्रत्येकाला काय पाहावं, त्याच्या आवडी निवडीबाबत विचार करण्याचे स्वातंत्र्य आहे. त्यामुळे प्रेक्षकांनी जास्त विचार न करता त्यांना काय वाटते हे जास्त महत्वाचे आहे. मला एक वाटतं जे क्षेत्रा आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्वाचं योगदान देते त्यात आपलाही वाटा असावा.

रक्षाबंधनची स्टोरी ही पाकिस्तानातील एका चित्रपटावर बेतलेली असून त्या कथेतील मांडणी तेथील परिस्थितीशी असल्याची टीका नेटकऱ्यांनी सुरु केली. भारतीय परंपरा, संस्कृतीचा विसर पडून शत्रु राष्ट्राच्या कलाकृतीवरुन आपल्या देशात चित्रपट निर्मिती करणे हे नेटकऱ्यांना खटकले आहे. यावर अक्षयनं प्रतिक्रिया दिली आहे. अक्षय काय म्हणाला हे आपण जाणून घेणार आहोत. त्यानं आमिर आणि माझ्या चित्रपटाबाबत लोकांनी गैरसमज करुन घेऊ नये असे म्हटले आहे. प्रेक्षकांनी हे चित्रपट जरुर पाहावेत. आता मी लोकांना सांगुनही ते ऐकत नसतील तर यापलीकडे आणखी काय करावे असा प्रश्न अक्षयनं केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून आमिर खानच्या लाल सिंग चढ्ढा आणि अक्षय कुमारच्या रक्षाबंधन यावरुन मोठ्या वादाला सुरुवात झाली आहे. सोशल मीडियावरुन या दोन्ही चित्रपटांवर प्रचंड टीकाही होत आहे. लाल सिंग चढ्ढावर बहिष्कार घालण्याची मागणी प्रेक्षकांनी केली आहे.