बाहुबलीचा भल्लालदेव भडकला, डिलीट केल्या इन्स्टा पोस्ट्स, कारण ऐकाल तर... Rana Daggubati | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rana Daggubati deletes all of his instagram posts know reason

बाहुबलीचा भल्लालदेव भडकला, डिलीट केल्या इन्स्टा पोस्ट्स, कारण ऐकाल तर...

Rana Daggubati: बाहुबलीचा अभिनेता भल्लालदेव म्हणजे राणा दग्गुबातीनं इन्स्टाग्राम(Instagram) वरनं सगळ्या पोस्ट डिलिट(Post Delete) केल्या आहेत. इन्स्टाग्रामवर राणा दग्गुबातीचं इन्स्टाग्राम अकाऊंट दिसत असलं तरी अभिनेत्यानं तिथनं आपले सगळे रील्स आणि फोटो डिलिट केले आहेत. राणा दग्गुबातीनं उचलेलं हे मोठं पाऊल चाहत्यांना मात्र हैराण करुन सोडत आहे. काही दिवसांपूर्वीच त्यानं आपल्या पत्नीसोबत लग्नाच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन सोशल मीडियावर शेअर केलं होतं,तेव्हा तर सगळंच आलबेल वाटत होतं. पण आता त्यानं अचानक इन्स्टाग्राम अकाऊंटवरनं सगळं डिलीट केल्यानं चाहत्यांना याचं कारण जाणून घ्यायचं आहे.(Rana Daggubati deletes all of his instagram posts know reason)

राणा दग्गुबातीनं इन्स्टाग्रामवरनं अखेर सगळ्या पोस्ट डिलीट का केल्या? हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही, पण काही दिवसांपूर्वी राणाने सोशल मीडियापासून ब्रेक घेण्याचं मात्र म्हटलं होतं. ५ ऑगस्ट २०२२ ला राणाने ट्वीटर वर घोषणा केली होती की सोशल मीडियापासून तो सध्या लांब राहणार आहे. त्यानं लिहिलं होतं,''काम सुरू आहे. पण सध्या सोशल मीडियापासून तो लांब जात आहे. तुम्हाला सिनेमात मात्र नक्कीच दिसेन. सगळ्यांचे प्रेम आणि आशीर्वाद कायम राहू दे''. माहितीसाठी इथं थोडक्यात सांगतो की,सध्या राणाच्या इन्स्टाग्रामवर ४ मिलियनपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत.

राणा दग्गुबातीची पत्नी मिहिकानं इन्स्टाग्रामवर लग्नाच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो नुकतेच शेअर केले होते. त्या दोघांनी लॉकडाऊनमध्ये लग्न केलं होतं. मिहिका व्यवसायाने इंजिनिअर आहे. ती हैदराबादमध्ये काम करते. तसंच ती स्वतःची मॅनेजमेंट कंपनी देखील चालवते. सोनम कपूरची ती खूप चांगली मैत्रिण आहे.

राणा दग्गुबाती याच्या वर्कफ्रंट विषयी बोलायचं झालं तर तो नुकताच Virata Parvam सिनेमात दिसला होता. मात्र बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा सपशेल आपटला होता. या सिनेमानं १२ करोडची कमाई केली होती. याआधी तो पवन कल्याणच्या 'भीमला नायक' सिनेमातही दिसला होता.