'खिलाडी' ठरला जगातील सहावा सर्वाधिक श्रीमंत अभिनेता 

सकाळ ऑनलाईन टीम
Wednesday, 25 November 2020

अक्षयचा नुकताच लक्ष्मी बॉम्ब हा चित्रपट नुकताच डिजिटल डिस्ने प्लस हॉटस्टार व्हीआयपी वर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने अनेक विक्रम मोडीत काढले.

मुंबई - बॉलीवूडमधील प्रख्यात अभिनेता अक्षय कुमार आता जागतिक पातळीवर जाऊन पोहचला आहे. सर्वाधिक कमाई करण्याच्या बाबतीत त्याने जगात सहाव्या क्रमांकावर उडी घेतली आहे. नुकतीच फोर्ब्स हायेस्ट पेड अॅक्टर 2020 च्या यादीत त्याने 48.5 मिलियन डॉलरची कमाई केल्याचे नमूद करण्यात आले आहे.

अक्षयने कमाईच्या बाबतीत बॉलीवूडचा भाईजान सलमान खान आणि शाहरुख खानला मागे टाकले आहे. यामुळे अक्षयच्या फॅन्सकडून त्याला शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. त्याच्यावर कौतूकाचा वर्षाव करण्यात येत आहे. अक्षयने वर्षाला 48.5 मिलियन डॉलर (362 कोटी रुपये) एवढी प्रचंड कमाई केली आहे. त्यामुळे तो  सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्याच्या टॉप 10 च्या यादीत सहाव्या स्थानावर आहे.  87.5 मिलियन डॉलर कमाईसह ड्वेन जॉन्सन या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. तर रेयान रेनॉल्ड (71.5 मिलियन डॉलर), मार्क वाह्यबर्ग (58 मिलियन डॉलर), बॅन अफ्लॅक (55 मिलियन डॉलर) आणि विन डीजल (54 मिलियन डॉलर) यांचा सर्वाधिक कमाई करणा-या कलाकारांच्या यादीत टॉप 5 मध्ये समावेश आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

2020 च्या सुरूवातीला तान्हाजी हा ब्लॉकबस्टर चित्रपट देणारा अभिनेता अजय देवगण बॉलिवूडमधील सर्वाधिक कमाई करणारा पाचवा अभिनेता आहे. या चित्रपटाची टक्कर बॉक्स ऑफिसवर दीपिकाच्या छपाक या चित्रपटासोबत झाली होती. असे असूनही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सुमारे 277 कोटी रुपये कमवले होते. 

'जीमसुटवर नव्हे साडीवरच मारले पुशअप्स' व्हिडीओ व्हायरल

अक्षयचा नुकताच लक्ष्मी बॉम्ब हा चित्रपट नुकताच डिजिटल डिस्ने प्लस हॉटस्टार व्हीआयपी वर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने अनेक विक्रम मोडीत काढले.  ओटीटी प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक बघितला गेलेला चित्रपट म्हणून लक्ष्मी बाँबचे नाव घ्यावे लागेल.  अक्षय आता लवकरच कृती सेनन हिच्यासह 'बच्चन पांडे', सारा अली खान आणि धनुषसह 'अतरंगी रे', वाणी कपूरसह 'बेल बॉटम' आणि मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरसह 'पृथ्वीराज' या चित्रपटात दिसणार आहे. चित्रपटांव्यतिरिक्त प्रॉडक्ट एंडोर्समेंटमधूनही अक्षयला मोठ्या प्रमाणात नफा मिळतो.

हे ही वाचा: सैफ अली खानची वेबसिरीज 'दिल्ली'चं नाव बदललं, 'या' नावाने होणार रिलीज  

सलमान खान बॉलिवूडचा दुसरा सर्वाधिक कमाई करणारा अभिनेता आहे. प्रत्येक चित्रपटासाठी 100 कोटी रुपये घेणार्‍या या अभिनेत्याने बिग बॉस 14 साठी 450 कोटी रुपये घेतले आहेत. यावर्षी आमिरचा कोणताही चित्रपट रिलीज झालेला नसला तरी यंदाच्या सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्याच्या यादीत तो चौथ्या क्रमांकावर आहे. शाहरुख बॉलिवूडमध्ये सर्वाधिक कमाई करणारा तिसरा अभिनेता आहे. चित्रपटांव्यतिरिक्त शाहरुखचे प्रॉडक्शन हाऊस रेड चिली एंटरटेन्मेंट वेब सिनेमा आणि मालिकांची निर्मिती करत आहे. 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akshay Kumar richest actor in world placed in six number position