जय श्रीराम! मंदिरासाठी खारीचा वाटा उचला; अक्षय कुमारने केलं आवाहन

akshay kumar share video request to peoples contribute for ayodhya ram mandir
akshay kumar share video request to peoples contribute for ayodhya ram mandir

पुणे - अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे. गेल्यावर्षी 5 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले. सध्या राम मंदिराच्या बांधकामासाठी देशभरातून निधी गोळा करण्यासाठी मोहिम सुरु करण्यात आली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी यामध्ये 5 लाख रुपयांचे योगदान दिलं आहे. आता अभिनेता अक्षय कुमारने जय श्रीराम म्हणत लोकांनाही मदतीचे आवाहन केलं आहे.

अक्षय कुमारने सोशल मीडियावर एक विडिओ पोस्ट केला आहे. त्यामध्ये रामायणात खारीने उचलेल्या वाटा उचलल्याची गोष्ट सांगितलं. त्यानंतर आपणही यामध्ये योगदान देणार आहे असं सांगत तुम्हीसुद्धा वानर आणि खार होऊन योगदान करावं असे आवाहन अक्षयने केलं आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

अक्षयने मुलीला सांगितली गोष्ट 
सोशल मीडियावर अक्षयने व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यामध्ये अक्षयने मुलीला राम सेतू निर्माणाची गोष्ट सांगितल्याचं म्हटलं आहे. एकीकडे वानरसेना तर दुसरीकडे लंका आणि या दोघांमध्ये विशाल समुद्र होता. सितेला परत आणण्यासाठी राम सेतू बांधणं गरजेचं होतं. लंकेत जाण्यासाठी वानर मोठे दगड उचलून समुद्रात टाकून राम सेतू बांधत होते. हे सर्व प्रभू  रामचंद्र  किनाऱ्यावर थांबून पाहत होते. तेवढ्यात त्यांचे लक्ष एका खारीकडे गेले. ती खार अंगाला वाळू लावून घेत होती. त्यानंतर वानरांनी रचलेल्या दगडांकडे जाऊन परत समुद्राच्या पाण्यात जात होती. प्रभुरामचंद्रांनी त्या खारीला  काय करत आहेस असा प्रश्न विचारला. तेव्हा खारीने सांगितलं कि दगडांच्या फटीत मी वाळू भरत आहे. अशा प्रकारे राम सेतू तयार होण्यात खारीचा वाट्याची  गोष्ट अक्षयने सर्वाना या व्हिडिओद्वारे सांगितली.
हे वाचा - भाजप नेत्यांचा 'तांडव' : सैफच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com