अक्षयकुमारने घेतला मोठा निर्णय; अन्य निर्मातेही टाकतायत त्याच्या पावलावर पाऊल....

अक्षयकुमारने घेतला मोठा निर्णय; अन्य निर्मातेही टाकतायत त्याच्या पावलावर पाऊल....

मुंबई : अवघ्या जगभरात कोरोनाने धुमाकूळ घातला असतानाच आता कोरोनाबाबत सकारात्मक बातम्या यायला सुरुवात झाली आहे. भारतासह अनेक देशांमध्ये 'अनलॉक' ची प्रक्रिया सुरू झाली आहे. बॉलीवूडमध्ये चित्रीकरणास सुरुवात झाली आहे. अक्षय कुमार आपल्या बेल बॉटम चित्रपटासाठी लंडनला जाणार आहे. त्याने दाखविलेले हे धारिष्ट्य पाहता आता अन्य निर्मात्यांनीही आपल्या चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी परदेशवारीचा प्लॅन आखण्यास सुरुवात झाली आहे. अनेक पातळ्यांवर ही तयारी पूर्ण झाल्याचे समजते.

मुंबईतून गोरेगावच्या फिल्मसिटीमध्ये चित्रीकरणासाठी बाहेर न पडणारे कलाकार व तंत्रज्ञ कोरोनाच्या भीतीने घरातच बंद आहेत. मात्र सर्वात अगोदर अक्षय कुमारने मोठी हिंमत दाखविल्याचे समजते. अक्षयने तिकिटांचे आरक्षण केले आहे. अक्षयबरोबरच वाणी कपूर, दिग्दर्शक रणजित एम. तिवारी तसेच अनय टीम मेंबर्सची तयारी झाली आहे. सगळ्यांचे तिकीटांचे आगाऊ आरक्षणही केले आहे. मात्र जर पुन्हा शेवटच्या क्षणी केंद्र व राज्य सरकारच्या निर्णयात काही बदल झाल्यास विशेष चार्टर विमानाचीही तयारी केली असल्याचे समजते. ज्या ठिकाणी चित्रीकरण प्रस्तावित आहे तेथील परवानग्या मिळाल्याचेही समजते. तेथील वास्तव्य, सामान, वाहतूक, अन्न, औषधोपचार  स्थानिक प्रशासनाची संपर्क व परवानग्यासह विविध बाबींची पूर्तता व त्यासाठी विशेष व्यक्तींची जोरदार तयारी आहे.

सेटवर सर्वाना पीपीई कीट, मास्क, हातमोजे, फेस शिल्ड व उच्च पातळीवरील अन्य रोगप्रतिकारक औषधे व अन्य सामानाची जमवाजमव झाली आहे. सेटवर जाण्यापूर्वी सर्वांची टेस्ट होईल. दररोज थर्मल चेकिंग, ऑक्सिजन पातळीची क्षमता तसेच सेटवर अन्य प्रकारची वैद्यकीय साधनांची उपलब्धता करण्यात येईल. बेल बॉटम चित्रपटाच्या लेखकाच्या म्हणण्यानुसार अंदाजे चाळीस ते पन्नास दिवसाचे शेड्युल्ड ठरले आहे. अक्षय कुमारने हिंमत दाखवल्यामुळेच ही तयारी पुढे सुरू झाली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अक्षय कुमारपाठोपाठ अन्य प्रॉडक्शन हाऊसेसही परदेशात चित्रीकरण करण्याचा विचार करीत आहेत. कारण आपल्याकडील परिस्थिती लवकरात लवकर सुधारण्याची शक्यता वाटत नाही. सरकारच्या नियमावलीनुसार चित्रपटाचे चित्रीकरण करणे शक्य नाही. त्यामुळे कोरोना नसलेल्या देशात जाऊन उरलेले चित्रीकरण पूर्ण करण्याच्या विचारात काही निर्माते आहेत.  
---
संपादन : ऋषिराज तायडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com