अक्षय कुमारने शेअर केला हेलिकॉप्टरमधील जॅकलिनचा केस कुरळे बनवतानाचा एक मजेदार व्हिडिओ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Akshay Kumar-Jacqueline Fernandez
#akshaykumar#Jacqueline Fernandez#helicopter#rams etu#daman#viralvideo#

जॅकलिनने दिले हेलिकॉप्टरच्या मदतीने केस कुरळे करण्याचे धडे!

sakal_logo
By
प्रणाली मोरे

अक्षय कुमार(Akshay Kumar) आपल्या स्वभावाने आणि वागणूकीने आपल्या सगळ्याच हिरोईन्सना खूप कम्फर्टेबल करतो हे आता सर्वपरिचित आहे. भले त्याच्या लग्नाआधी त्याचे अनेक अभिनेत्रींसोबत अफेअर्स होते पण लग्नानंतर मात्र एक प्रियंका चोप्रा सोडली तर त्याचं नाव फारसं कोणत्या अभिनेत्री सोबत जोडलं गेलं नाही. अक्षयसोबत काम करणा-या अभिनेत्री नेहमीच त्याचं कौतूक करताना दिसतात,त्याच्या मजा-मस्करीला विनोदाचा भाग म्हणून ती एन्जॉय करताना दिसतात. अक्षयही आपल्या सोशल मीडियावरून आपल्या सहकलाकारांसोबतचे अनेक मजेदार किस्से पोस्ट करीत असतो अथवा त्याचे व्हिडिओदेखील शेअर करताना दिसतो.

सध्या अक्षय कुमार नुसरत भरूचा आणि जॅकलिन फर्नांडिससोबत(Jacqueline Fernandez) 'राम सेतू'(Ram Setu) ह्या चर्चित सिनेमाच्या शूटिंगचं राहिलेलं शेड्युल पूर्ण करण्यात व्यस्त आहे. या सिनेमाच्या शूटिंगसाठी अक्षय कुमार जॅकलिन फर्नांडिससोबत हेलिकॉप्टरने(helicopter)दमणला जात होता. तेव्हा त्याने जॅकलिनचा केस कुरळे बनवतानाचा एक मजेदार व्हिडिओ त्याच्या सोशल मीडियावर शेअर केलाय. त्यात जॅकलिन हेलिकॉप्टरच्या छोट्या गोलाकार खिडकीतून आपले केस बाहेर काढून जोरदार वारा आणि त्त्या गोलाकार वक्र खिडकीच्या सहाय्याने आपले केस कुरळे करतेय. आणि खरंच, तिच्या त्या आटापिटा करून केस हटके प्द्धतीने कुरळे करण्याच्या धडपडीला यश आल्याचे व्हिडिओच्या शेवटाला दिसून येतेय. हा व्हिडिओ शेअर करून अक्षयने त्याला कॅप्शन दिले आहे की,"महिलांनो, तुम्ही जुगाड करून हेलिकॉप्टरमध्ये तुमचे केस कुरळे कसे करू शकता यावर एक सॉल्लिड उपाय आहे...सौजन्य-जुगाडू जॅकलीन फर्नांडिस." यासोबतच त्याने मोठ्याने हसणारा इमोजी टाकला आहे.जॅकलीनचे हे टॅलेंट पाहून अक्षय कुमार आश्चर्यचकित झाला हे मात्र खरंय.

हेही वाचा: 'मी पण ठरेन का नेपोटिझमचा बळी?'

अक्षय आणि जॅकलिनने एकत्र काम केलेल्या ब-याच सिनेमांनी बॉक्सऑफिसवर ब-यापैकी कमाई केलीय. त्यांच्या जोडीलाही पसंत केले गेलेय. 'राम सेतू' सिनेमात त्यांची केमिस्ट्री कशी असेल याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे, नुकताच अक्षय कुमारच्या आगामी 'पृथ्वीराज' या सिनेमाचा टीझर रिलिज झाला. पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावर आधारित हा सिनेमा आहे. या सिनेमाच्या निमित्ताने रसिकांना एक ऐतिहासिक मेजवानी मिळणार आहे. या सिनेमाच्या टीझरने एकाच दिवसात लाखो लाइक्स मिळविले आहेत. अक्षयच्या या सिनेमातील लूकलाही पसंती मिळालीय. या सिनेमात अक्षयसोबत मानुषी छिल्लर,संजय दत्त,सोनू सूद अशी स्टारकास्ट दिसणार आहे. अक्षयच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'सुर्यवंशी' या सिनेमानेही १५० कोटींचा पल्ला गाठला आहे.

loading image
go to top