'सेम टू सेम आलिया', रणबीरला तरी कळेल का फरक? चाहत्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया|Alia Bhatt duplicate video viral Instagram | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Alia bhatt

'सेम टू सेम आलिया', रणबीरला तरी कळेल का फरक? चाहत्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

Bollywood Actress) बॉलीवूडची स्टार अभिनेत्री आलिया भट्ट (Alia bhatt) ही तिच्या वेगळेपणासाठी नेहमीच चर्चेत असते. गेल्या महिन्यात तिचं लग्न पार पडलं. प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर सोबत झालेल्या या विवाहसोहळ्याला (Bollywood News) बॉलीवूडमधील वेगवेगळे सेलिब्रेटी उपस्थित होते. मुंबईतील (Ranbir Kapoor) आर के स्टुडिओमध्ये त्यांचा विवाह पार पडला. लग्नाच्या दोन दिवसांनंतर रणबीर आणि आलिया आपआपल्या प्रोजेक्टवर दिसून आले. सध्या सोशल मीडियावर आलियाच्या डुप्लिकेटचा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला (Bollywood celebrity) आहे. त्याला नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंटस केल्या आहे. यासगळ्यात अभिनेता रणबीर देखील ट्रोल झाला आहे.

आलियाची डुप्लिकेट म्हणून जी व्यक्ती ओळखली जाते तिनं आपल्या इंस्टावरुन तो व्हिडिओ व्हायरल केला आहे. त्याला नेटकऱ्यांनी गंमतीशीर प्रतिक्रियाही दिल्या आहे. एका युझर्सनं लिहिलं आहे की, काय सांगता ही आलिया आहे का, विश्वास बसत नाही. एकदम सेम टू सेम दिसत आहे. ही दुसरी आलिया आहे. आतापर्यत त्या व्हिडिओला तीन लाखांपेक्षा अधिक व्ह्युज मिळाले आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

ज्यांनी तो व्हिडिओ पाहिला आहे त्यांना पहिल्यांदा धक्काच बसला आहे की, आपण नेमकं कुणाला पाहतो आहे, गेल्या काही दिवसांपासून आलिया भट्ट ही तिच्या गंगुबाई काठियावाड चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. शंभर कोटीहून अधिक व्यवसाय या चित्रपटानं केला होता. त्याच्यासमोर पुष्पा, आरआरआरचं आव्हान असतानाही त्यानं मोठी कमाई करुन अनेकांना धक्का दिल्याचे दिसून आले. आलिया ही नेहमीच तिच्या हटकेपणासाठी ओळखली जाणारी सेलिब्रेटी आहे.

हेही वाचा: Bollywood Top 10 : अमिताभ, शाहरुख, सलमान कोणीच नाही! आहे तरी कोण?

सध्या सोशल मीडियावर आलियाच्या डुप्लिकेटनं लाखो चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. सेलेस्टी बैरागी नावाच्या व्यक्तीला आलियाची डुप्लिकेट म्हणून ओळखलं जातं. सध्या तिचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून तिनं दिल तो पागल है गाण्यावर लिप सिंग शुट केलं आहे. तिच्या त्या गाण्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे.

हेही वाचा: Allu Arjun On Bollywood: पुष्पा म्हणतो,आमची तुलना बॉलीवूडशी होईलच कशी!

Web Title: Alia Bhatt Duplicate Video Viral Instagram Fans Shocked Funny Comment

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top