'पैशांसाठी कायपण नाय करायचं आलिया!', शुगर प्रॉडक्टची जाहीरात भोवली | Alia Bhatt Trolled sugar product advertisement | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Alia Bhatt Trolled sugar product advertisement

'पैशांसाठी कायपण नाय करायचं आलिया!', शुगर प्रॉडक्टची जाहीरात भोवली

Bollywood News: बॉलीवूडचे सेलिब्रेटी पैशांसाठी कोणत्याही जाहिरात करतात असा आरोप त्यांच्यावर सोशल मीडियावरुन नेटकरी करताना दिसतात. त्यामुळे आता आलिया देखील (Bollywood Actress) नेटकऱ्यांच्या रडारवर आली आहे. तिनं एका रियॅलिटी शो मध्ये (the kapil sharma show) शुगरच्या एका प्रॉडक्टची जाहिरात केली.ती नेटकऱ्यांना न आवडल्यानं त्यांनी तिला ट्रोल केले आहे. आलिया पैशांसाठी काहीही करायला तयार होईल. अशा शब्दांत (bollywood movies) तिच्यावर टीकाही केली आहे. गेल्या महिन्यात आलियाचं रणबीर कपूरसोबत लग्न झालं. त्या लग्नाची गेल्या काही दिवसांपासून चर्चाही सुरु होती. त्यांच्या लग्नाचे फोटोही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. मुंबईतील चेंबुर येथल्या आर के स्टुडिओमध्ये त्यांचा विवाहसोहळा पार पडला होता. दुसरीकडे आलियाच्या त्या जाहिरातीनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

एकीकडे आलिया शाकाहाराचा प्रचार आणि प्रसार करते. तसेच चाहत्यांनी आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी याचे धडेही ती नेटकऱ्यांना देत असते. मात्र एका कार्यक्रमातून आलियानं केलेली साखरेच्या प्रॉडक्टची जाहिरात तिला महागात पड़ल्याचे दिसून आले आहे. आलिया तर अजिबात साखर खात नाही मग साखरेची जाहीरात कशाला करते, असा प्रश्न तिला काही नेटकऱ्यांनी विचारत धारेवर धरले आहे. तिनचं एका मुलाखीतून यापूर्वी सोशल मीडियावरील आपल्या फॉलोअर्सला साखर आणि साखरेपासून तयार केलेले पदार्थ खाऊ नका, असे सांगितले होते. आता तिची जाहीरात तिला भोवल्याचे दिसून आले आहे.

हेही वाचा: Chandramukhi Review: 'नेभळट दौलतराव, रडकी चंद्रकला' - प्रेमाचं पान रंगलचं नाही

त्याचं झालं असं की, काही दिवसांपूर्वी आलिया ही तिच्या एका चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कपिल शर्माच्या शोमध्ये आली होती. त्यामध्ये तिनं कॉफी घेताना त्यामध्ये साखर टाकली आहे असं सांगितलं. त्यावर कपिल तिला म्हणतो की, जास्त नाही थोडीच टाकली आहे. मला ही कॉफी नको. कारण त्यात साखर आहे. तुम्ही जास्त साखर खाऊ नका. ती खायची झाल्यास फळांतून घ्या, असं आलियानं सांगितलं होतं. मात्र त्यानंतर आलिया ही साखरेपासून तयार केलेल्या वेगवेगळ्या प्रॉडक्टच्या जाहिरातीमध्ये दिसली होती. त्यामुळे तिला नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे.

हेही वाचा: Ranbir Alia Wedding:या बॉलीवूड सेलीब्रेटीज ने दिल्या रणबीर आलियाला लग्नाच्या शुभेच्छा

Web Title: Alia Bhatt Trolled Suger Product Advertisement Social Media Users Take Class Kapil Sharma Show

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top