Pushpa: ३०० गाड्या, १५०० लोक, 'पुष्पा'च्या शूटिंगची गोष्ट निराळी!

या चित्रपटाशी संबंधित काही रंजक माहिती जाणून घेऊयात..
Allu Arjun and Rashmika Mandanna movie Pushpa
Allu Arjun and Rashmika Mandanna movie Pushpa

अभिनेता अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) 'पुष्पा: द राइज' (Pushpa) हा चित्रपट कोरोनाच्या काळात प्रदर्शित होऊनही बॉक्स ऑफिसवर वर्चस्व गाजवत आहे. दक्षिण असो वा उत्तर, देशाच्या कानाकोपऱ्यातील प्रेक्षकांना हा चित्रपट आवडला आहे. प्रेक्षकांच्या प्रचंड मागणीनंतर तो ओटीटीवरही प्रदर्शित झाला आहे. बॉक्स ऑफिसवर 'पुष्पा: द राइज'ने 300 कोटींहून अधिक कमाई केली. या चित्रपटात अल्लू अर्जुनसोबत अभिनेत्री रश्मिका मंदानाची भूमिका आहे. सुकुमार दिग्दर्शित 'पुष्पा'ची कथाच नाही तर गाणी आणि संवादही खूप लोकप्रिय झाले आहेत. या चित्रपटाशी संबंधित काही रंजक माहिती जाणून घेऊयात.. (Pushpa movie Unknown Facts )

अल्लू अर्जुनने या चित्रपटात 'पुष्पा' ही व्यक्तिरेखा साकारली आहे. चित्रपटाची कथा आंध्र प्रदेशातील लाल चंदनाच्या तस्करीवर आधारित आहे. चित्रपट निर्मात्यांनी हा चित्रपट दोन भागात प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. 'पुष्पा'चे निर्माते वाय रविशंकर यांनी एका मुलाखतीत सांगितलं की, 'पुष्पा'ची कथा खूप मोठी आहे आणि ती अडीच तासात पूर्ण सांगणं कठीण आहे. 'पुष्पा'च्या दुसऱ्या भागाची तयारी सुरू झाली असून 10 टक्के कामही पूर्ण झाल्याचं सांगण्यात येत आहे.

'पुष्पा' चित्रपटाचं 80 टक्के शूटिंग पूर्ण झाल्यानंतर निर्मात्यांनी त्याचा दुसरा भाग बनवण्याचा विचार केला. कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर याच्या दुसऱ्या भागाचं काम लवकरच सुरू केलं जाईल. 'पुष्पा'चं बहुतांश शूटिंग आंध्र प्रदेशातील मारेदुमिली जंगलात झालं आहे. चित्रपटाच्या संपूर्ण टीमला जंगलात नेण्यात आलं. पूर्ण टीमला जंगलात नेण्यासाठी निर्माते दररोज 300 वाहने वापरत असत. चित्रपटातील एका सीनसाठी 1500 लोक जमवण्यात आले होते. या चित्रपटासाठी दररोज 500 लोकांची गरज होती. तर एका गाण्यासाठी 1000 लोकांना जमवण्यात आलं.

Allu Arjun and Rashmika Mandanna movie Pushpa
नाद खुळा! 'पुष्पा'मधल्या 'श्रीवल्ली' गाण्याचं मराठमोळं व्हर्जन

चित्रपटातील चंदन तस्करीच्या वाहतुकीच्या दृश्यांचं चित्रीकरण करण्यात निर्मात्यांना खूप अडचणी येत होत्या. याला कारण होतं जंगलातील कच्चा मार्ग. अशा परिस्थितीत प्रवास सुरळीत व्हावा म्हणून टीमने अनेक ठिकाणी कच्चे रस्ते बांधले. केरळच्या जंगलातही काही दिवस शूटिंग करण्यात आलं. त्यासाठी कृत्रिम चंदनाची लाकडं घेऊन टीम केरळच्या जंगलात गेली. तेथून परतत असताना पोलिसांनी त्यांना अडवलं. चित्रपटाच्या शूटिंगसाठी कृत्रिम लाकूड वापरत असल्याचं टीमला स्पष्ट करावं लागलं. अल्लू अर्जुनचा लूक 'पुष्पा'मध्ये बदलण्यासाठी त्याला दररोज दोन तास लागायचे.

Allu Arjun and Rashmika Mandanna movie Pushpa
'पुष्पा'वर बंदी घाला; गृहमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी

कोणत्याही चित्रपटात सिनेमॅटोग्राफरची भूमिका महत्त्वाची असते. तो चित्रपटातील दृश्यांना जिवंत करतो. मिरोस्ला कुबा ब्रोजेक हे पुष्पाचे सिनेमॅटोग्राफर आहेत. त्यांनी पोलंडमधून सिनेमॅटोग्राफीचं प्रशिक्षण घेतलं. 'पुष्पा' चित्रपटाची पहिली झलक एप्रिल 2021 मध्ये पाहायला मिळाली होती. चित्रपटाच्या टीझरमध्ये अल्लू अर्जुनने दमदार अभिनयाची छाप सोडली. पुष्पाचा टीझर टॉलिवूडमध्ये 1.5 दशलक्ष लाईक्ससह सर्वाधिक लोकप्रिय टीझर आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com