Allu Arjun: 70 वर्षानंतर तेलुगू इंडस्ट्रीला मिळाला तो बहुमान! अल्लू अर्जुन ठरला पहिला अभिनेता ज्याचा....

Allu Arjun Wax Statue:
Allu Arjun Wax Statue:Esakal
Updated on

Allu Arjun Wax Statue: साउथचा अभिनेता अल्लू अर्जुन हा सध्या कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत आहे. त्याला सर्वात स्टायलिश स्टारही म्हणतात. दिसण्यापासून अभिनयापर्यंत तो त्याच्या स्टाईलने भल्या भल्या स्टार्संना टक्कर देतो. अल्लूचे स्टारडम केवळ दक्षिणेपुरते मर्यादित नाही, तर त्याचे चाहते जगभरात कानाकोपऱ्यात पसरले आहेत.

अल्लूने नुकताच सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार पटकवला. आता अल्लू अर्जुन त्याच्या मेणाच्या पुतळ्यासाठी चर्चेत आहे. या वर्षाच्या अखेरीस दुबईतील मादाम तुसादमध्ये अल्लू अर्जूनचा मेणाचा पुतळा तयार करण्यात येणार आहे. आता नुकतच अल्लू अर्जुनने दुबईतील मादाम तुसाँ संग्रहालयात त्याच्या मेणाच्या पुतळ्याला भेट दिली. या संग्रहालयाच्या अधिकृत पेजवरने याबाबत एक व्हिडिओ शेअर केला आहे.

Allu Arjun Wax Statue:
Krissann Barretto Marriage: 'कैसी ये यारियां' फेम अभिनेत्रीने अगदी साध्या पद्धतीने उरकलं लग्न!

यात अल्लू अर्जुन आपल्या मेनाच्या पुतळ्यासाठी मोजमाप देतांना दिसत आहे. मादाम तुसाँ दुबईतील मेणाच्या पुतळ्यासाठी त्याची निवड करण्यात आल्याबद्दल त्याने आनंद व्यक्त केला आहे.

Allu Arjun Wax Statue:
Vinod Khanna Birth Anniversary : करिअरच्या टॉपवर असताना कोणत्या गोष्टीमुळे व्यथित झाले विनोद खन्ना? सहा वर्ष 'ते' सिक्रेट होतं कायम

अल्लू अर्जुन तिथे पोहोचताच त्याने आपल्या पहिल्या आपल्या अनुभवाबद्दलही सांगितले. तो म्हणाला, 'एकप्रकारे, माझ्यासाठी हा एक अतिशय खास अनुभव आहे. कारण लहानपणी जेव्हा मी मादाम तुसाँमध्ये गेलो होतो तेव्हा मला कधीच वाटले नव्हते की मी मादाम तुसाँमध्ये मेणाच्या रूपात स्वत:ला पाहीन.

Allu Arjun Wax Statue:
Dono Premier: अंदाज अपना अपना! सलमान अन् आमिर जेव्हा समोरासमोर येतात... व्हिडिओ व्हायरल

अल्लू अर्जुनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, तो सध्या 'पुष्पा: द राइज'चा सिक्वेल असलेल्या 'पुष्पा: द रूल'च्या शूटिंगमध्ये करत आहे. 'पुष्पा : द रुल' पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अल्लू अर्जुनसोबत रश्मिका मंदान्ना मुख्य भूमिकेत आहे. त्यासोबत त्याने अॅटली कुमारसोबतही एक चित्रपट साईन केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com