

Allu arjun received 69 th national film award for pushpa wife sneha : दाक्षिणात्य चित्रपटविश्वामध्ये आपल्या नावाची ठळक ओळख तयार करणाऱ्या अल्लु अर्जूनची क्रेझ मोठी आहे. केवळ बॉलीवूडच नाहीतर संपूर्ण देशभरामध्ये अल्लूचा चाहतावर्ग मोठा आहे. त्याला सोशल मीडियावर फॉलो करणाऱ्या चाहत्यांची संख्याही प्रचंड आहे. पुष्पा या चित्रपटातून लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचलेल्या अल्लूबद्दल पत्नी स्नेहाची पोस्ट चर्चेत आली आहे.
पुष्पा मध्ये अल्लूनं जे काम केले त्याचा गौरव म्हणून त्याला राष्ट्रीय पुरस्कारानं गौरविण्यात आले. काल दिल्लीमध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये अल्लूला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले. त्यात प्रसिद्घ अभिनेत्री आलिया भट्ट, क्रिती सेनॉन, दिग्दर्शक करण जोहर, विवेक अग्निहोत्री यांचाही सहभाग होता.
Also Read - Navratri 2023 : तलवारीचं 'स्त्री'त्त्व आणि आदिमायेच्या गुणतत्त्वांचा सहसंबंध काय आहे?
या सगळ्यात अल्लूच्या पत्नी स्नेहाची पोस्ट चर्चेत आली आहे. तिनं अल्लू अर्जूनविषयी थोडक्यात आपलं म्हणणं मांडत भावना व्यक्त केल्या आहेत. त्यावर आलेल्या प्रतिक्रिया देखील लक्ष वेधून घेणाऱ्या आहेत. बॉक्स ऑफिसवर अल्लू अर्जूनच्या पुष्पा या चित्रपटानं विक्रमी कमाई केली होती. सलग तीन आठवड्यांहून अधिक काळ हा चित्रपट प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय होता.
तेलुगू सुपरस्टार असणाऱ्या अल्लू अर्जूनचं पत्नी स्नेहा रेड्डीनं केलेलं कौतुक चाहत्यांना आवडलं आहे. तिनं त्याच्यासोबतचा फोटो शेयर करुन लिहिलं आहे की, आमच्यासाठी तो क्षण खूपच संस्मरणीय होता. मला माहिती आहे की तू नेहमीच तुझ्या कामाप्रती खूपच आदर ठेवला आहेस. त्या कामाप्रती असणारी निष्ठा दाखवली आहेस. स्नेहाच्या त्या पोस्टवर नेटकऱ्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया देखील अल्लूविषयी खूप काही सांगून जाणाऱ्या आहेत.
त्या पुरस्कार सोहळ्यामध्ये अल्लूच्या लूकचे देखील कौतुक झाले होते. यावेळी त्यानं क्रिती सेनॉन सोबत काढलेला सेल्फी चाहत्यांच्या चर्चेचा विषय होता. आलिया, क्रिती अन् अल्लू यांचे फोटोही चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले. अल्लुच्या आगामी प्रोजेक्टविषयी सांगायचे झाल्यास त्याचा पुष्पा २ हा चाहत्यांच्या प्रचंड उत्सुकतेचा विषय आहे. तो पुढील वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.