लेडी गागाच्या हरवलेल्या कुत्र्यांना शोधून देणाऱ्यासाठी तब्बल इतके कोटी रुपये बक्षीस! 

lady gaga
lady gaga

प्रसिद्ध अमेरिकन पॉप गायिका लेडी गागा हिने तिच्या हरवलेल्या दोन कुत्र्यांना शोधून देणाऱ्यासाठी तब्बल तीन कोटी ६८ लाख रुपये बक्षीस देण्याची घोषणा केली. या ऑस्कर विजेती गायिकेच्या दोन पाळीव कुत्र्यांचं बुधवारी अपहरण करण्यात आलं होतं. या कुत्र्यांची देखरेख करणाऱ्याला गोळी झाडण्यात आली होती. कोजी आणि गुस्ताव अशी या दोन हरवलेल्या कुत्र्यांची नावं असून तिसरा कुत्रा मिस एशिया इथून पळाला होता. या तिसऱ्या कुत्र्याला नंतर पोलिसांनी शोधून काढलं. बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, कुत्र्यांची देखरेख करणाऱ्याला रुग्णालयात दाखल केलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. 

लेडी गागा श्वानप्रेमी असून अनेक मोठमोठ्या शोजमध्ये तिने तिच्या पाळीव कुत्र्यांना सोबत नेलं आहे. अमेरिकन म्युझिक अवॉर्ड आणि २०१७ मधल्या सुपर बाऊल हाफ्टाइम शोमध्येही तिने तिच्या कुत्र्यांना सोबत नेलं होतं. लेडी गागाच्या कुत्र्यांची देखरेख करणाऱ्यावर गोळी का झाडण्यात आली, यामागचं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Lady Gaga (@ladygaga)

अमेरिकेत फ्रेंच बुलडॉग्सच्या चोरीच्या अनेक घडना घडताना दिसतात. या प्रजातीचे कुत्रे अत्यंत महागड्या किंमतीने विकले जातात. पाळीव कुत्रे हरवल्यानंतर लेडी गागाने त्यांना शोधून देणाऱ्याला पाच लाख डॉलर्स म्हणजेच जवळपास ३ कोटी ६८ लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं. इतकंच नव्हे तर त्या व्यक्तीची कोणतीच चौकशी केली जाणार नाही, असंही तिने म्हटलं होतं. त्यानंतर एका महिलेनं लेडी गागाच्या हरवलेल्या दोन्ही कुत्र्यांना सुखरुप तिच्याकडे पोहोचवलं. या महिलेचा कुत्र्यांच्या अपहरणाशी किंवा देखरेख करणाऱ्या व्यक्तीला गोळी झाडण्याशी कुठलाही संबंध नाही असंही म्हटलं जातंय. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com