Amitabh Bachchan : त्यात काय बच्चनचं देखील घर गळतंय! पाऊस आला जलसा 'लिक'

मुंबईत अमिताभ यांचे निवासस्थान असणाऱ्या जलसा बंगल्यासमोर गर्दी करणाऱ्यांविषयी नेहमीच चर्चा होत असते.
Amitabh Bachchan bollywood actor mumbai rains water damage jalsa
Amitabh Bachchan bollywood actor mumbai rains water damage jalsa

Amitabh Bachchan bollywood actor mumbai rains water damage jalsa : बॉलीवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांना बातमीत येण्यासाठी कोणतंही कारण पुरतं. वयाची ८० वर्षे पूर्ण केल्यानंतर देखील बिग बी यांच्या लोकप्रियतेत कमी झालेली नाही. याउलट अधिक उत्साहानं नवअभिनेत्यांसोबत काम करताना दिसतात. त्यांच्यापेक्षा अधिक हिरारीनं सहभागी होताता. त्यामुळेच की काय अमिताभ यांची लोकप्रियता कायम आहे.

मुंबईत अमिताभ यांचे निवासस्थान असणाऱ्या जलसा बंगल्यासमोर गर्दी करणाऱ्यांविषयी नेहमीच चर्चा होत असते. बिग बींची एक झलक पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येनं चाहते त्या बंगल्याबाहेर गर्दी करत असतात. मात्र आता एका वेगळ्या कारणामुळे जलसा चर्चेत आल्याचे दिसून आले आहे.

Also Read - एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

बिग बी यांच्या जलसा बंगल्याविषयी एक बातमी समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये झालेल्या पावसानं नागरिकांची मोठी त्रेधातिरपीट उडाली होती. त्याचा फटका अमिताभ यांना देखील बसला होता.

अवकाळी जोरदार पावसानं मुंबईला झोडपून काढले होते. त्यात अमिताभ यांच्या जलसा बंगल्यात गळती सुरु झाल्याचे दिसून आले. त्यानंतर आता त्या बंगल्याच्या डागडुजीचे काम हाती घेण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. हवामान विभागानं खरं तर येत्या काही दिवसांत जोरदार पावसाची शक्यता वर्तवली होती. त्यानुसार मुंबईत झालेल्या पावसानं अनेकांची तारांबळ उडाल्याचे दिसून आले.

Amitabh Bachchan bollywood actor mumbai rains water damage jalsa
RRR Oscar 2023 : 'राम आणि सीतेचं नाव म्हणूनच मिळालं ऑस्कर!' साध्वींचं अजब वक्तव्य

त्या जोरदार पावसाचा फटका अमिताभ यांच्या जलसा बंगल्यादेखील बसला आहे. काही दिवसांपूर्वीच अमिताभ हे एका अपघातात जखमी झाल्याची बातमी व्हायरल झाली होती. यानंतर चाहत्यांनी चिंता व्यक्त त्यांना काळजी घेण्याचा सल्ला दिला होता. अमिताभ यांनी आपल्या ब्लॉगमध्ये याविषयी सविस्तर लिहिले असून त्यात आता वेगानं बंगल्याची दुरुस्ती सुरु असल्याचे म्हटले आहे.

Amitabh Bachchan bollywood actor mumbai rains water damage jalsa
Shah Rukh Khan: कोण आहे हा 'छोटा पठाण' ज्याचं शाहरुखने केलं कौतुक, पाहा व्हिडिओ

मुंबईत अवचित येणाऱ्या पावसानं काय स्थिती होऊ शकते याचा प्रत्यय त्यादिवशीच्या सकाळी आला. यामध्ये वॉटर प्रुफिंग पुन्हा एकदा करुन घेण्याची गरज आहे असे दिसून आले. पावसाचा जोर पाहता त्याचा थोडा फटका बसलाही. काही ठिकाणी गळतीही झाल्याचे अमिताभ यांनी त्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे. सोशल मीडियावरुन त्यावर आलेल्या प्रतिक्रिया भलत्याच भन्नाट आहे.

Amitabh Bachchan bollywood actor mumbai rains water damage jalsa
Salman Khan Death Threat : सलमानला जीवे मारण्याच्या धमकीचं निघालं 'युके कनेक्शन'? मुंबई पोलिसांना मिळाली नवी माहिती!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com