अमिताभ बच्चन यांनी केले 'ब्रह्मास्त्र'च्या डायरेक्टरला चॅलेंज, म्हणाले आता...

Untitled-3.jpg
Untitled-3.jpg

मुंबई : बाॅलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन हे सोशल मिडीयावर नेहमीच अॅक्टीव्ह असतात. सर्वच अभिनेते आपल्या टि्वटर अकाऊंटवरून आपल्या आगामी चित्रपटाबाबत माहिती देत असतात. आपल्या फॅन्सला माहिती अनेक बाबींची माहिती वेगवेगळ्या सोशल मिडीयाच्या प्लॅटफाॅर्मव्दारे देतात. नुकतीच अमिताभ बच्चन यांनी टि्वटरवरून आगामी 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाच्या रिलीझ डेटबाबत माहिती दिली आहे.

तसेच या चित्रपटाचे निर्माते अयान मुखर्जी यांना आता या चित्रपटाची डेट न बदलण्याची विनंती केली आहे. तसेच याबाबत त्यांना ओपन चॅलेंज केले आहे. अमिताभ यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे की, 'ब्रह्मास्त्र' 4 डिसेंबर 2020 ला रिलीज होणार आहे. तसेच त्यांनी म्हटले आहे की, आता या चित्रपटाची रिलीज डेट बदलण्याची संमती अयान मुखर्जी यांना नाही. बच्चन यांच्या या टि्वटवरती अनेक जण आता कमेंट करत आहेत. तसेच प्रतिक्रिया देत आहेत.

या अगोदर अमिताभ बच्चन, रणबीर कपूर, आलिया भट स्टारकास्ट असणारा हा चित्रपट मे महिण्यात रिलीज होणार होता. अमिताभ बच्चन, रणबीर कपूर, आलिया भट यांचा हा चित्रपट सुपरहिरोच्या कथानकावर आहे. या चित्रपटाबाबत फॅन्समध्ये खुप उत्सुकता आहे. तसेच या चित्रपटाबाबत अद्यापही मोठा सस्पेंन्स आहे. आता हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे की, हा चित्रपट प्रेक्षकांना कितपत भावतो. अमिताभ बच्चन यांचे 'गुलाबो सिताबो', 'झुंड', 'ब्रह्मास्त्र' असे अनेक चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com