'त्या' गुलमोहराच्या झाडासाठी अमिताभ बच्चन कोरोनामुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच घराबाहेर पडले

amitabh bachchan
amitabh bachchan

मुंबई- अमिताभ बच्चन यांचे चाहते गेल्या महिन्यात बिग बी कोरोना संक्रमित झाल्याने उदास होते. बिग बींसोबतंच त्यांच्या घरातील तीन सदस्य म्हणजेच अभिषेक, ऐश्वर्या आणि आराध्या कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले होते. आता बिग बींसोबत इतरांचीही प्रकृती उत्तम आहे. अशांतंच नुकतेच कोरोना मुक्त झाले बिग बी पहिल्यांदा त्यांच्या 'जलसा' या बंगल्यातून बाहेर पडताना दिसून आले.

अमिताभ सोशल मिडियावर नेहमीच सक्रीय असतात. ते दररोज त्यांच्या चाहत्यांसाठी एक खास फोटो शेअर करत असतात. यावेळी बिग बींनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर त्यांचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये अमिताभ त्यांच्या 'प्रतीक्षा' या बंगल्यावर दिसून आले. त्याचं कारणंही तसं खासंच आहे. 

बिग बी यांनी शेअर केलेला फोटो पाहिला तर लक्षात येईल की ते 'प्रतिक्षा' बंगल्यातील गार्डनमध्ये दिसून येत आहेत. इतकंच नाही तर ज्या ठिकाणी मुसळधार पावसामुळे त्यांच्या गार्डनमधील अनेक वर्ष जुनं असलेलं गुलमोहराचं झाड पडलं होतं त्या ठिकाणीच ते दिसून येत आहेत. बिग बींनी त्यांच्या या पोस्टमध्ये त्या गुलमोहराच्या झाडाबद्दल लिहिलं आहे जे ४४ वर्षांआधी त्यांनी त्यांच्या प्रतिक्षा या बंगल्यातील गार्डनमध्ये लावलं होतं. सोबतंच त्यांनी त्यांची आई तेजी बच्चन यांच्या जयंतीनिमित्त एक झाड लावलं आहे त्याबद्दल सांगितलं आहे.  

बिग बींनी हा फोटो शेअर करताना एक कॅप्शन लिहिलं आहे. बिग बी लिहितात, 'इथे मोठं गुलमोहराचं झाड मी तेव्हा लावलं होतं जेव्हा आम्ही १९७६मध्ये हे प्रतिक्षा घर घेतलं होतं. नुकत्याच एका वादळाने हे झाड उन्मळून पडलं. मात्र मी आईच्या वाढदिवशी (१२ ऑगस्ट) तिच्या नावाने पुन्हा एक गुलमोहराचं झाड लावलं आहे. त्याच ठिकाणी जिथे आमचं जुनं झाड होतं.'

या पोस्टसोबत बिग बींनी हरिवंश राय बच्च यांची कविता देखील शेअर केली आहे. सोशल मिडियावर बिग बींची ही पोस्ट व्हायरल होत आहे. बिग बींच्या चाहत्यांना ही पोस्ट खूप आवडत आहे आणि ते प्रतिक्रिया देखील देत आहेत.  

amitabh bachchan steps out for the first time after covid 19 recovery on his mother birthday  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com