बिग बींवर होते 90 कोटींचे कर्ज; वसूलीसाठी घरी यायची माणसं

2013 मध्ये दिलेल्या मुलाखतीमध्ये अमिताभ यांनी त्यावेळच्या त्यांच्या आर्थिक परिस्थितीबद्दल सांगितले.
बिग बींवर होते 90 कोटींचे कर्ज; वसूलीसाठी घरी यायची माणसं

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (amitabh bachchan) हे त्यांच्या अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतात. 1999 साली 'अमिताभ बच्चन कोओप्रेशन' या व्यवस्थापन कंपनीच्या अपयशामुळे बच्चन कर्जात बुडाले. 2013 मध्ये दिलेल्या मुलाखतीमध्ये अमिताभ यांनी त्यावेळच्या त्यांच्या आर्थिक परिस्थितीबद्दल सांगितले. (amitabh bachchan was in debt of over 90 crore creditors used to land at home and abusive)

2013 साली दिलेल्या मुलाखतीमध्ये अमिताभ यांनी सांगितले, 'माझे वेगवेगळ्या लोकांकडे 90 कोटी रूपये देणे बाकी होते. मी दूरदर्शन वाहिनीसह सर्वांना परतफेड केली. जेव्हा त्यांनी मला दिलेल्या पैशाचे व्याज मागितले तेव्हा त्याबदल्यात मी त्यांच्या जाहिरातींमध्ये काम केले. माझ्या 'प्रतिक्षा' या बंगल्यावर लोक पैसे मागायला यायचे. ते लोक शिवीगाळ करत, धमकी देखील देत असत. तो काळ माझ्यासाठी खूप वाईट होता. त्या काळाने मला विचार करायला लावला. मला माहीत होतं की मी चांगले काम करू शकतो. मी त्यावेळी यशजींकडे (यश चोपडा) गेलो. यशजी माझ्या घरामागे राहात होते. मी त्यांच्याकडे मला काम देण्याची विनंती दिली. त्यानंतर त्यांनी मला मोहब्बते या चित्रपटामधील महत्वपूर्ण भूमिका साकारण्याची संधी दिली.' मोहब्बते या चित्रपटाच्या यशानंतर आणि कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केल्यानंतर त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली.

बिग बींवर होते 90 कोटींचे कर्ज; वसूलीसाठी घरी यायची माणसं
बहिणीवर टीका केल्याने अली गोनी भडकला; रागाच्या भरात सोडलं ट्विटर

गेल्या वर्षी अमिताभ यांनी 'गुलाबो सिताबो' या चित्रपटामधून ओटीटी प्लॅटफोर्मवर पदार्पण केले. लवकरच ते 'कौन बनेगा करोडपती' च्या 13 व्या सिझनमध्ये दिसणार आहेत. 'कौन बनेगा करोडपती' या शोची सुरूवात 2000 साली झाली. तिसरा सिझन सोडता अमिताभ यांनी या शोच्या सर्व सिझनमध्ये सुत्रसंचालन केले. तिसऱ्या सिझनचे सुत्रसंचालन अभिनेता शाहरूख खानने केले.

बिग बींवर होते 90 कोटींचे कर्ज; वसूलीसाठी घरी यायची माणसं
अर्जुनने सांगितली शाळेतील कटू आठवण; 'नव्या आईवरुन चिडवायचे मित्र'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com