esakal | बहिणीवर टीका केल्याने अली गोनी भडकला; रागाच्या भरात सोडलं ट्विटर
sakal

बोलून बातमी शोधा

aly goni

बहिणीवर टीका केल्याने अली गोनी भडकला; रागाच्या भरात सोडलं ट्विटर

sakal_logo
By
स्वाती वेमूल

'बिग बॉस १४'चा Bigg Boss 14 माजी स्पर्धक अली गोनीने Aly Goni रागाच्या भरात काही काळासाठी ट्विटरचं अकाऊंट बंद केलं आहे. काही नेटकऱ्यांनी अलीच्या कुटुंबीयांवर निशाणा साधल्याने त्याचा राग अनावर झाला. अलीची बहीण इलहाम गोनीला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं. अली सध्या त्याची गर्लफ्रेंड जास्मिन भसीनसोबत Jasmin Bhasin गोव्यात सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. (bigg boss fame Aly Goni quits Twitter after fans attack family)

अलीने ट्विट करत लिहिलं, 'काही अकाऊंट्स माझ्या बहिणीवर टीका करत आहेत आणि तिच्याबद्दल वाईट गोष्टी बोलत आहेत. अशा गोष्टींकडे मी आधी दुर्लक्ष करत होतो. पण याकडे मी आता आणखी दुर्लक्ष करू शकत नाही. माझ्या कुटुंबीयांवर टीका करण्याची हिंमत करू नका. मी सध्या इतक्या रागात आहे की कदाचित माझं अकाऊंटसुद्धा डिलिट करेन.' यानंतर आणखी एक ट्विट करत अलीने ट्विटर अकाऊंट काही काळासाठी बंद केल्याचं सांगितलं. 'मी काही काळासाठी ट्विटरवर नसेन. माझ्या लोकांना फार प्रेम आणि शांती राहू द्या', असं त्याने पुढे लिहिलं.

हेही वाचा: सुनील शेट्टीची इमारत सील; कोरोना रुग्ण आढळल्याने महापालिकेचा निर्णय

हेही वाचा: आमिर खाननंतर आणखी एका अभिनेत्याकडून घटस्फोटाचा निर्णय जाहीर

अलीची गर्लफ्रेंड जास्मिन भसीननेही याबाबत ट्विट केलं. 'मी कोणावरही आरोप करत नाहीये किंवा गैरसमजही करून घेत नाहीये. फक्त तुम्हा सर्वांना विनंती करतेय की शांत आणि सकारात्मक रहा. जेव्हा आपण नकारात्मक गोष्टींवर प्रतिक्रिया देणं टाळतो, तेव्हा त्या गोष्टी आपोआप मरून जातात. जर तुम्ही माझ्यावर प्रेम करत असाल, तर तुम्ही फक्त इतरांवर प्रेमाचा वर्षाव कराल', असं तिने लिहिलं. अली आणि जास्मिन एकमेकांचे चांगले मित्र होते. मात्र बिग बॉसच्या घरात या दोघांमध्ये प्रेमाचा बहर फुलला. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर हे दोघं सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो, व्हिडीओ पोस्ट करताना दिसतात.

loading image