Amitabh Bachchan: घरातील 'त्या' सदस्याच्या निधनानंतर अमिताभ बच्चन यांची भावूक पोस्ट

एक दिवस ते आपल्याला सोडून जातात.. म्हणत अमिताभ हळहळले..
Amitabh Bachchan’s pet dog passes away Actor shares painful post
Amitabh Bachchan’s pet dog passes away Actor shares painful postsakal

Amitabh Bachchan : सध्या बॉलीवुडमध्ये 'बिग बी' अमिताभ बच्चन यांच्या 'उंचाई' या चित्रपटाची बरीच चर्चा. प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद आणि कौतुक या चित्रपटाला मिळत आहे. एकीकडे हा आनंदाचा क्षण अनुभवत असतानाच त्यांच्या आयुष्यात एक दुःखद घटना घडली आहे. बच्चन कुटुंबातील एका सदस्याचं निधन झालं आहे. अमिताभ यांच्या घरातील पाळीव कुत्र्याचं निधन झालं असून बिग बींनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून त्याच्या जाण्याचे दुःख व्यक्त केले आहे.

(Amitabh Bachchan’s pet dog passes away Actor shares painful post)

Amitabh Bachchan’s pet dog passes away Actor shares painful post
Ameya Khopkar: पाकिस्तानी कलाकार दिसला तर.. बॉलीवुडला अमेय खोपकर यांचा 'मनसे'चा इशारा

अमिताभ (amitabh bachchan) यांनी आपल्या लाडक्या कुत्र्यासोबत एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यांच्या पाळीव कुत्र्याचे निधन झाल्याचे अमिताभ चांगलेच हळहळले आहेत. त्यांनी भावनिक पोस्ट शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे. अमिताभ म्हणतात,'आमचा एक गोड छोटा मित्र.. हे येतात मोठे होतात आणि एक दिवस आपल्याला सोडून जातात' अशी पोस्ट त्यांनी केली आहे.

Amitabh Bachchan’s pet dog passes away Actor shares painful post
Sharad Ponkshe: मुलींनी जरा.. श्रध्दा वालकर हत्ये प्रकरणी शरद पोंक्षेंची प्रतिक्रिया

अमिताभ यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत अमिताभ यांच्या दुःखात सहभागी झाले असल्याचे सांगितले आहे. तर काहींनी पाळीव प्राण्याविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

अमिताभ बच्चन यांनी आपल्या ब्लॉगमध्येदेखील लिहिलं आहे की,'आमच्या या छोट्या मित्राच्या अशा कायमच्या निघून जाण्याने आम्हाला खूप दुःख झालं आहे. जेव्हा तो आमच्या आसपास असायचा तेव्हा चैतन्य असायच,' असं ते म्हणाले आहेत. याआधी 2013 साली बिग बींच्या 'शानौक' या पाळीव कुत्र्याचा मृत्यू झाला होता. पाळीव प्राण्यांविषयी अमिताभ यांना प्रचंड प्रेम आहे. त्यामुळे त्यांच्या घरचा कुत्रा त्यांना सोडून गेल्याने ते प्रचंड दुःखी झाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com