अमिताभ यांचा मदतीचा हात; अखिल भारतीय चित्रपट महामंडळाकडे सुपूर्त केली मदत..

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 25 जून 2020

अमिताभ यांनी यापूर्वी कित्येकांना मदत केली आहे. काही मजुरांना त्यांच्या गावी परतायचे होते त्यांना अमिताभ यांनी मदत केली आहे. आता त्यांनी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाला मदत केली आहे. 

मुंबई : कोरोना महामारीचा फटका सगळ्याच क्षेत्रांना बसलेला आहे. चित्रपटसृष्टीदेखील याला काही अपवाद नाही. चित्रपटसृष्टीतील सगळे व्यवहार ठप्प झालेले आहेत आणि गंभीर परिस्थिती आहे. अशा गंभीर परिस्थितीत काही मदतीचे हातही पुढे येत आहेत. 

मुंबई पोलिस आयुक्तांचं नागरिकांसाठी खास ट्विट, केलं हे आवाहन...

आता असाच मदतीचा हात पुढे केला आहे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी. अमिताभ यांनी यापूर्वी कित्येकांना मदत केली आहे. काही मजुरांना त्यांच्या गावी परतायचे होते त्यांना अमिताभ यांनी मदत केली आहे. आता त्यांनी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाला मदत केली आहे. 

बाळ रडले अन् 'ती' जाहिरात कायद्याच्या कचाट्यात आली...

बिग बाजारचे 1500 रुपयांचे 500 कूपन्स त्यांनी महामंडळाकडे सुपूर्द केले आहेत. ही कूपन्स महामंडळाने आपल्या 500 सभासदांना दिली आहेत. जेणेकरून त्यांना या कूपन्सव्दारे जीवनावश्यक वस्तू खरेदी करता येतील. अमिताभ यांनी केलेल्या या मदतीबद्दल अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांनी त्यांचे आभार मानले आहेत. 

नागरिकांनो सजग राहा.. सायबर गुन्हेगारीत वाढ; राज्यात 'इतके' गुन्हे दाखल...

यापूर्वी रितेश देशमुख आणि माधुरी दीक्षित यांनी चित्रपट महामंडळाला मदत केली आहे आणि महामंडळाने आपल्या सभासदांना ती दिली आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: amitabh bachhan gives coupon to film corporation to help film workers