खान कुटुंबातील 'या' व्यक्तीसोबत सोनाक्षी लग्न करणार का? Sonakshi Sinha | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sonakshi Sinha

खान कुटुंबातील 'या' व्यक्तीसोबत सोनाक्षी लग्न करणार का?

बॉलिवूडची 'दबंग गर्ल' अर्थात अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या Sonakshi Sinha लग्नाच्या जोरदार चर्चा होत आहेत. सोनाक्षी ही खान कुटुंबाची सून होणार असल्याचं म्हटलं जात आहे. याबाबत अद्याप सोनाक्षी किंवा शत्रुघ्न सिन्हा यांनी कोणतीही अधिकृत माहिती दिली नसली तरी तिच्या प्रियकराविषयी जाणून घेण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक आहेत. सलमान खानच्या 'दबंग' या चित्रपटातूनच सोनाक्षीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. याच चित्रपटातील भूमिकेमुळे तिला 'दबंग गर्ल' अशी ओळख मिळाली. आता सोनाक्षीचं नाव अभिनेता सोहैल खानचा मेहुणा बंटी सचदेवाशी Bunty Sachdeva जोडलं जात आहे.

२०१७ मध्ये सोनाक्षी आणि बंटीच्या साखरपुड्याची जोरदार चर्चा होती. बंटी हा सोहैल खानची पत्नी सीमाचा भाऊ आहे. बंटी हा पीआर एजन्सी कॉर्नरस्टोनचा मालक आहे. सोनाक्षी आणि बंटी यांना अनेकदा पार्ट्यांमध्ये एकत्र पाहिलं गेलं आहे.

लहानपणीचं प्रेम

'बॉलिवूड बबल'ने दिलेल्या वृत्तानुसार, सोनाक्षी जेव्हा शाळेत होती, तेव्हा ती एका मुलाच्या प्रेमात पडली. मात्र त्या मुलाने सोनाक्षीचा विश्वासघात केला. पाच वर्षांपर्यंत दोघं रिलेशनशिपमध्ये असल्याचं सोनाक्षीने एका मुलाखतीत सांगितलं होतं. मात्र तिने त्या मुलाचं नाव सांगितलं नाही.

bunty and sonakshi

bunty and sonakshi

हेही वाचा: 'आई कुठे काय करते' मालिकेवर पुरस्कारांचा वर्षाव

'झी न्यूज इंडिया'ने दिलेल्या वृत्तानुसार, बंटीचं २००९ मध्ये लग्न झालं होतं. अंबिका चौहानशी त्याने गोव्यात लग्न केलं. मात्र या दोघांचं लग्न फार काळ टिकलं नाही. लग्नाच्या चार वर्षांनंतर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. सोनाक्षीच्या आधी बंटीचं नाव सुष्मिता सेन, दिया मिर्झा, नेहा धुपिया आणि समीरा रेड्डी या अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं होतं. सोनाक्षी आणि बंटी हे २०१२ पासून एकमेकांना डेट करत असल्याचं म्हटलं जातंय.

loading image
go to top