अमृता फडणवीसांना 'कान्स'मध्ये विशेष पुरस्कार, फोटो केले शेअर

अमृता फडणवीस यांनी स्वत: या फिल्म फेस्टीवलचे फोटो शेअर करत ही माहिती दिली.
cannes film festival
cannes film festivalसकाळ

विरोधी पक्ष नेते देवंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस कायम कोणत्या ना कोणत्या कारणावरुन चर्चेत येत असते. सध्या त्यांची इंस्टाग्राम पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. कारण कान्स फिल्म फेस्टीवलमध्ये (cannes film festival ) अमृता फडणवीस यांना पुरस्कार मिळाला आहे आणि त्यांनी स्वत: या फिल्म फेस्टीवलचे फोटो शेअर करत ही माहिती दिली.

cannes film festival
'प्राजक्ता माळी माझी लेडी क्रश,तिच्यासोबत रोमान्स म्हणजे...'- ऋतुजा बागवे

अमृता यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहलय, ”अखेर बेटर वर्ल्ड फंड द्वारे आयोजित महत्त्वपूर्ण बदल घडवून आणण्यासाठी आणि जगावर सकारात्मक प्रभाव टाकल्याबद्दल #cannesfilmfestival मध्ये पुरस्कार प्राप्त झाला.” सोबतच त्यांनी आपल्या पोस्ट मध्ये इतर पुरस्कार विजेत्यांची नावं घेत त्यांचं अभिनंदन केलंय

cannes film festival
'रानबाजार'साठी प्राजक्ता माळीने वाढवले ११ किलो वजन, आता करतीय वर्कआऊट

कान्स चित्रपट महोत्सवात अमृता फडणवीस यांनी हजेरी लावली. कान्स रेड कार्पेटवर चालत अमृता यांनी अन्न, आरोग्य याबाबत जागृती करण्याचा प्रयत्न केला. यावेळी कोट डी'आयव्हर, डोमिनिक क्वेट्टारा, राजकुमारी घिडा तलाल, अभिनेता शेराॅन स्टोन, किआरा चॅप्लिन, अमृता फडणवीस आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com