Filmfare Marathi : फिल्मफेअरमध्ये 'धुरळा'.. सर्वाधिक पुरस्काराचा मानकरी

फिल्मफेअर अवॉर्ड मराठी हा पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. यंदा 'धुरळा' चित्रपटाने सर्वाधिक पुरस्कार पटकावले.  
dhurala, filmfare
dhurala, filmfare google

चित्रपट विश्वातील अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणारा फिल्मफेअर मराठी हा पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. गेल्या काही वर्षांपासून हा पुरस्कार मराठी चित्रपटांसाठीही दिला जात आहे. यंदाचे हे ६ वे पर्व असून मुंबईत अत्यंत दिमाखात हा सोहळा झाला. त्यासाठी वांद्रे येथील सेंट अँड्र्यूज ऑडिटोरियम मध्ये विशेष व्यवस्था करण्यात आली होती.

dhurala, filmfare
शरद केळकर आणि किशोर कदम एकत्र, 'ऑपरेशन रोमिओ'मध्ये महत्वाच्या भूमिका

Filmfare Marathi : यंदाही अनेक मराठी कलाकारांना आणि चित्रपटांना सन्मानित करण्यात आले. यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार झिम्मा (Jhimma) आणि कारखानिसांची वारी (Karkhanisanchi Wari) या चित्रपटांनी पटकावला. तर अंकुश चौधरीला (ankush chaudhari) धुरळा (Dhurala) चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार नेहा पेंडसे(Nehha Pendse)ला 'जून'(June)साठी आणि सई ताम्हणकर(Sai Tamhankar)ला धुरळा (Dhurala) चित्रपटासाठी विभागून देण्यात आला. यंदा 'धुरळा' या चित्रपटाला १६ म्हणजे सर्वाधिक नामांकने होती. तर 'सहा' पुरस्कार या चित्रपटाने पटकावले. या सोहळ्यात भारतरत्न लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

dhurala, filmfare
आर के हाऊसमध्ये रणबीर आलिया घेणार सात फेरे,माहीती झाली उघड..

अभिनेता सिद्धार्थ जाधव (sidhharth jadhav) आणि अभिनेता अमेय वाघ (amey wagh) यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. सोनाली कुलकर्णी, पूजा सावंत, मानसी नाईक, पुष्कर जोग, वैभव तत्ववादी, अमृता खानविलकर यांच्या सादरीकरणाने सोहळ्याला रंगत आणली. या सोहळ्याला मृणाल कुलकर्णी, पद्मिनी कोल्हापुरे, प्रसाद ओक, मंजिरी ओक, अमृता खानविलकर, प्रतीक गांधी, आदिनाथ कोठारे, सचिन पिळगावकर आणि रेणुका शहाणे यासह अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती.

प्लॅनेट फिल्मफेअर मराठी अवॉर्ड्स २०२१ चे विजेते

सर्वोत्कृष्ट पदार्पण (अभिनेत्री) - रेशम श्रीवर्धन (जून)
सर्वोत्कृष्ट पदार्पण (अभिनेता): रुतुराज वानखेडे - (जयंती) आणि विराट मडके - (केसरी)
सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक: अमर भारत देवकर-(म्होरक्या) आणि नवीन देशबोईना-(लता भगवान करे)
सर्वोत्कृष्ट चित्रपट: झिम्मा आणि कारखानीसांची वारी
सर्वोत्कृष्ट चित्रपट समीक्षक: द डिसिपल आणि भोंगा
मराठी चित्रपटसृष्टीतील योगदान: सुलोचना लाटकर
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : मंगेश जोशी (कारखानीसांची वारी)
सर्वोत्कृष्ट अभिनेता : अंकुश चौधरी (धुरळा)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : सई ताम्हणकर - (धुरळा) आणि नेहा पेंडसे (जून)
सर्वोत्कृष्ट अभिनेता समीक्षक: आदित्य मोडक (द डिसिपल)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री समीक्षक : सोनाली कुलकर्णी (पेन्शन) आणि नीना कुलकर्णी (फोटो-प्रेम)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता : सिद्धार्थ जाधव (धुरळा)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री: सोनाली कुलकर्णी (धुरळा) आणि गीतांजली कुलकर्णी (कारखानीसांची वारी)
सर्वोत्कृष्ट बालकलाकार : रमण देवकर (म्होरक्या)
सर्वोत्कृष्ट संगीत अल्बम: अमितराज (झिम्मा)
सर्वोत्कृष्ट गीत: गुरु ठाकूर-प्रीतम (कोणा मागं भिरभिरता)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक : आदर्श शिंदे- (धुराळा)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका : अपेक्षा दांडेकर (झिम्मा - माझे गाव)
सर्वोत्कृष्ट कथा : अच्युत नारायण- (वेगळी वाट)
सर्वोत्कृष्ट पटकथा : चैतन्य ताम्हाणे- (द डिसिपल)
सर्वोत्कृष्ट संवाद: इरावती कर्णिक (झिम्मा) आणि क्षितिज पटवर्धन (धुरळा)
सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाईन: पूजा तलरेजा आणि रवीन डी करडे - (द डिसिपल)
सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी: मिचल सोबोसिंस्की - (द डिसिपल)
सर्वोत्कृष्ट संकलन : अभिजित देशपांडे आणि सौरभ प्रभुदेसाई - (बळी)
सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत: एव्ही प्रफुल्लचंद्र- (धुरळा)
सर्वोत्कृष्ट साऊंड डिझाईन: अनिता कुशवाह आणि नरेन चंदावरकर (द डिसिपल)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com