हम जहाँ जहाँ चलेंगे आपका साया साथ होगा; 'अमूल'ची लता दीदींना श्रद्धांजली

Amul-The Taste of India
Amul-The Taste of India

सात दशकांहून अधिक काळ आपल्या भावपूर्ण आवाजाने सर्वांना मंत्रमुग्ध केल्यानंतर, लता मंगेशकर (Lata Mangeshkar) 6 फेब्रुवारी रोजी त्यांच्या स्वर्गीय निवासस्थानाकडे रवाना झाल्या. भारतीय लोकप्रिय डेअरी ब्रँड 'अमूल' (Amul -The Taste of India) ने आता या दिग्गज गायिकेला मनापासून श्रद्धांजली वाहिली आहे. अमूलने एक पोस्ट शेअर केली ज्यामध्ये लताजींच्या मोनोक्रोमॅटिक डूडलमध्ये तीन प्रतिमा आहेत. एकात त्या माईक स्टँड घेऊन गाताना दिसत आहेत, तर दुसऱ्यामध्ये वीणा हातात घेऊन. तिसरी प्रतिमा त्यांच्या तरुणपणाची आहे. 1966 च्या कल्ट क्लासिक 'मेरा साया' मधील त्यांच्या 'तू जहाँ जहाँ चलेगा मेरा साया साथ होगा' (Tu Jahan Jahan Chalega Mera Saaya Saath Hoga) या संस्मरणीय गाण्याचा संदर्भ देत त्यांनी चित्रासोबत लिहिले, 'हम जहाँ जहाँ चलेंगे आपका साया साथ होगा' (Hum Jahan Jahan Chalenge Aapka Saaya Sath Hoga).

दीदींच्या पार्थिवावर मुंबईतील शिवाजी पार्क येथे पूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. 'नाइटिंगेल ऑफ इंडियाला' (Nightingale of India) अखेरचा आदर वाहण्यासाठी, अभिनेते, पंत प्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि गायकांनी कार्यक्रमस्थळी आपली उपस्थिती लावली.

लता मंगेशकर यांचे बंधू हृदयनाथ (Hridaynath Mangeshkar) आणि त्यांचा मुलगा आदिनाथ मंगेशकर (Aadinath Mangeshkar) यांनी अंत्यदर्शन घेतले. अंतिम संस्कारावेळी तिला बंदुकीची सलामीही देण्यात आली.

Amul-The Taste of India
'बचपन के दिन भी क्या दिन थे.दिदी और मै'; आशा भोसले यांची भावूक पोस्ट
Amul
Amul

श्रोता कोणत्या का वयाचा असेना एकदा का त्यानं लता दीदींची गाणी ऐकली की तो त्यांचा चाहता व्हायचा. त्यांच्या स्वरावटींनी त्याला वेगळ्या संगीत विश्वात न्हावून निघाल्याचा आनंद होत असे. अतिशय प्रतिकुल परिस्थितीतून लता मंगेशकर यांनी आपल्या संगीत प्रवासाला सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी कौटूंबिक परिस्थितीला सावऱण्यासाठी संगीताचा आधार घेत मोठी जबाबदारी घेतली. हिंदी संगीतविश्वात त्यांना 'लता दीदी' (Lata Didi) म्हणून ओळखले जायचे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com