Angad Bedi: 'सगळा वेगळाच खेळ, आपला रोबोट झालाय! नेहाचा पती स्पष्टच बोलला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Angad Bedi

Angad Bedi: 'सगळा वेगळाच खेळ, आपला रोबोट झालाय!

Angad Bedi: बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री नेहा धुपिया हिला काही फारसा प्रतिसाद चाहत्यांकडून मिळाला नाही. निवडक चित्रपटांमध्ये ती थोडीशी चमकली. यापलीकडे तिला मोठा चाहतावर्ग लाभला नाही. याशिवाय ती एक फिटनेस फ्रीक, वेगवेगळे रियॅलिटी शो आणि वेबसीरिजमध्ये दिसली. त्यातील तिच्या भूमिकांना प्रेक्षकांनी पसंत केले. नेहानं अभिनेता अंगद बेदीशी लग्न केलं. अंगद हा सध्या त्याच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आला आहे. त्यानं मुंबई, बॉलीवूड आणि पैसा यावरुन एक वक्तव्य केले आहे.

सध्याच्या काळात आपण मानवी मुल्यांपासून लांब जात चालल्याची खंत त्याने व्यक्त केली आहे. माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात आपल्याला फारसं कुणाच काही देणे घेणे राहिलेले नाही. त्याचा परिणाम आपल्या नात्यावर झाला आहे. सोशल मीडियाचा दैनंदिन आयुष्यावरील होणारा परिणाम कशाप्रकारे आपल्या वर्तनात बदल करतो यावर अंगद बोलला आहे. त्यानंतर त्यानं बॉलीवूड आणि त्यातील अर्थकारण याकडे देखील लक्ष वेधले आहे. अंगदनं एका शॉर्ट फिल्ममध्ये काम केलं असून त्याचे स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले.

त्यानिमित्तानं पत्रकारांशी साधलेल्या संवादात बॉलीवूड, त्या चित्रपटांच्या निर्मिती साठी होणार खर्च आणि प्रेक्षकांचा प्रतिसाद यावर एकत्रितपणे प्रतिक्रिया दिली आहे. याशिवाय त्यानं हिंदूस्थान टाईम्सला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अशा अभिनेत्यांविषयी प्रतिक्रिया दिली आहे ज्यांनी आपल्या कष्टानं स्वताचे वेगळे स्टारडम तयार केले आहे, लोकांना शंभर कोटींचा चित्रपट दिसतो मात्र त्यासाठी संबंधित एखाद्या अभिनेत्यानं घेतलेली मेहनत दिसत नाही.

हेही वाचा: Johny Depp: बायकोच्या विरोधात खटला जिंकला! मेजवानीवर केला 48 लाख रुपयांचा खर्च

तुमच्यावर कुणी शंभर कोटी रुपये लावायला तयार होणार नाही. याचे कारण ते पैसे वसूल करण्याची जबाबदारी मोठी असते. ज्या अभिनेत्यावर शंभर कोटी रुपये लागले आहेत त्याच्यावर असणारा मानसिक ताणही मोठा असतो. लोकांना विराट कोहली मोठा दिसतो. मात्र त्यामागील त्याची मेहनत दिसत नाही. हाच फरक आहे.

हेही वाचा: Rakhi Sawant: 'राखीशी लग्न नको रे बाबा!' बॉयफ्रेंड आदिलचा नकार

Web Title: Angad Bedi Model Actor Neha Dhupia Husband Share Bollywood Reality Interview

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..