Johny Depp: बायकोच्या विरोधात खटला जिंकला! मेजवानीवर केला 48 लाख रुपयांचा खर्च|Hollywood star Johnny Depp celebrate | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hollywood star Johnny Depp celebrate trial win

Johny Depp: बायकोच्या विरोधात खटला जिंकला! मेजवानीवर केला 48 लाख रुपयांचा खर्च

Johnny Depp Party: साऱ्या जगानं हॉलीवूडचा अभिनेता जॉनी डेप आणि त्याची पत्नी एंबर हर्ड यांच्या घटस्फोटाचा खटला सोशल मीडियावर पाहिला. त्यात त्यांनी एकमेकांवर केलेले आरोप भलतेच धक्कादायक होते. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यातील वाद सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. अखेर तो खटला पायरेटस ऑफ कॅरेबियनच्या अभिनेत्यानं जिंकला आहे. त्यानं तो आनंद मोठ्या उत्साहात साजरा केला आहे. खटला जिंकल्यानंतर त्यानं एका शानदार मेजवानीचे आयोजन केले होते, त्यासाठी त्यानं तब्बल 48 लाख रुपयांचा खर्च केल्याची बातमी समोर आली आहे. जॉनीला हर्ड करुन 10.35 मिलियन रुपयांची नुकसान भरपाई मिळणार आहे.

नवरा बायकोच्या भांडणाची प्रसिद्धी सोशल मीडियावर होणं ही काही आता नवीन (Johny Depp) गोष्ट राहिली नाही. मात्र आपल्या आवडत्या अभिनेत्याच्या घटस्फोटाचा खटला (Hollywood News) असेल तर त्याची चर्चा होणारच. सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून जॉनी डेप आणि हर्डच्या केसची चर्चा सुरु आहे. त्यातून (social media viral news) वेगवेगळे आरोप समोर आले होते. ते आरोप कमालीचे धक्कादायक होते. अखेर त्या खटल्यातून जॉनीच्या पत्नीनं त्याच्यावर मानसिक अत्याचार केल्याचे समोर आले होते. तिनं त्याची गेल्या काही वर्षांपासून बदनामी करण्यास सुरुवात केली होती. त्याविरोधात जॉ़नीनं कोर्टामध्ये धाव घेतली होती. जेव्हा जॉनीनं खटला दाखल केला तेव्हा त्यावरुन वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा सुरु होत्या. अखेर त्यानं तो खटला जिंकला. त्यानंतर त्यानं वाराणसी नावाच्या एका हॉटेलमध्ये मेजवानी दिली.

इंग्लडमधील बर्मिंगहॅम येथे असणाऱ्या एका भारतीय हॉटेलमध्ये मित्रांसमवेत पार्टी केली. त्यासाठी त्यानं 62 हजार डॉलर खर्च केले. त्याची रक्कम ही 48.22 लाख रुपये एवढी आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जॉनीनं डिनरचे आयोजन केले होते. ती एक कॉकटेल पार्टी होती. डेपनं त्याचा संगीतकार मित्र जेफ बेफ आणि त्यांचे इतर 20 सहकाऱ्यांसोबत मोठी पार्टी केल्याचे दिसुन आले आहे. त्याची चर्चा सोशल मीडियावर आहे. त्या हॉटेलचे मॅनेजर मोहम्मद हुसैन यांनी सांगितले की, जॉनी यांचा आम्हाला फोन आला होता. त्यानुसार आम्ही तयारी केली. त्यांनी मोठ्या शानदार मेजवानी आपल्या मित्रांना दिली. चिकन कबाब, तंदुरी, पनीरचे वेगवेगळे पदार्थ, उंची मदय, यांचा समावेश त्या पार्टीमध्ये होता.

टॅग्स :Entertainment