Nayak 2 : अनिल कपूर पुन्हा मुख्यमंत्री होणार! अभिनेत्यानं चाहत्याच्या कमेंटला दिलं खास उत्तर

अनिल कपूर लवकरच त्यांच्या 'या' सुपरहिट चित्रपटाचा सिक्वेल तयार करणार असल्याची हिंट दिली आहे.
 Anil Kapoor hint about Nayak 2
Anil Kapoor hint about Nayak 2 Esakal

Anil Kapoor hint that Nayak 2: बॉलिवूडचे सुपरफिट अभिनेते अनिल कपूर सध्या त्यांच्या 'अ‍ॅनिमल' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. अ‍ॅनिमल' हा सिनेमाच मुळात अनिल कपूर यांच्यासाठी झालेला आहे असं हा सिनेमा पाहिल्यानंतर वाटते.

कारण पूर्ण सिनेमात रणविजय त्याच्या वडिलांच्या हल्ल्याचा बदला घेतना दिसत आहे. अ‍ॅनिमल चित्रपटात त्यांनी साकारलेल्या बलबीर सिंहची भुमिका प्रेक्षकांना खुप आवडली.

आता या चित्रपटानंतर अनिल कपूर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. ही बातमी कळाल्यानंतर त्यांचे चाहते आनंदीत झाले आहेत.

 Anil Kapoor hint about Nayak 2
Rocking Star Yash's Movie: 'अ‍ॅनिमल' चा रेकॉर्ड मोडण्यासाठी KGF स्टार यशचा 'टॉक्सिक' मैदानात! दमदार टिझर रिलिज!

मिडिया रिपोर्टनुसार, अनिल कपूर लवकरच त्यांच्या जुन्या व्यक्तिरेखेत दिसणार आहे. अनिल कपूरने आपल्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. ज्यात 'मिस्टर इंडिया', 'तेजाब', 'राम लखन', 'विरासत', 'ताल' या चित्रपटांचा सामावेश आहे.

त्यात अनिल कपूरचा यांचा ब्लॉकबस्टर ठरलेला 'नायक' हा सिनेमा सर्वांच्या लक्षात असेल. या चित्रपटात त्यांनी एका दिवसाचा मुख्यमंत्री बनून लोकांची मने जिंकली होती. या चित्रपटातील अनिल कपूरने साकारलेली व्यक्तिरेखा आजही लोकांच्या लक्षात आहे.

 Anil Kapoor hint about Nayak 2
Kapil Sharma Sunil Grover Reunion: कपिल-सुनीलमधला वाद अखेर मिटला, सहा वर्षांनंतर पुन्हा एकत्र

आता अनिल कपूरने त्यांच्या 2001 मधील सुपरहिट चित्रपट 'नायक' च्या सिक्वेलबाबत हिंट दिली आहे. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अनिल कपूर यांनी को-स्टार बॉबी देओलसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये अनिल कपूर आणि बॉबी देओल शर्टलेस झाले आहेत.

या पोस्टवर कमेंट करत एका चाहत्याने लिहिले की, नायक 2 फिल्म बनवा सर. तुम्ही दोघेही अप्रतिम दिसत आहात. तर या चाहत्याच्या कमेंटला उत्तर देताना अनिल कपूरने लिहिले - 'लवकरच बनवत आहे.'

Nayak 2
Nayak 2
 Anil Kapoor hint about Nayak 2
Fighter Teaser: हृतिक - दीपिकाच्या 'फायटर' टीझरवर कमेंट्सचा पाऊस, पंतप्रधान मोदींशी होतीय तुलना

आता अनिल कपूर यांची प्रतिक्रिया पाहिल्यानंतर लवकरच 'नायक 2' चित्रपट येणार अशी चर्चा आहे. 2001 मध्ये रिलीज झालेल्या नायक या चित्रपटाला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले होते.

या चित्रपटात अनिल कपूरशिवाय राणी मुखर्जी, परेश रावल आणि अमरीश पुरी यांच्या प्रमुख भूमिका होत्या.

या चित्रपटाची कथा मुख्यमंत्री आणि राजकारणाभोवती फिरणारी दिसली होती. आता राज्याचे राजकारण पाहता पुन्हा नायक 2 चित्रपट येणार असल्याचे संकेत मिळाल्या नंतर चाहते उत्सुक आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com