लग्नानंतर अंकिता लोखंडेचा नवीन घरात असा झाला गृहप्रवेश...

सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करीत अभिनेत्रीनं चाहत्यांसोबत केला आनंद शेअर
Ankita Lokhande,Vicky Jain
Ankita Lokhande,Vicky JainGoogle

अंकिता लोखंडे(Ankita Lokhande) आणि विकी जैनचा(Vicky Jain) विवाह सोहळा नुकताच पार पडला. मुंबईतील ग्रॅंड हयात या फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये पार पडलेल्या या सोहळ्याला विकी-अंकिताचे जवळचे कुटुंबिय आणि मित्र-मैत्रिणींनी हजेरी लावली होती. अंकिता-विकीच्या लग्नाआधी पार पडलेल्या मेहेंदी,संगीत आणि हळदीच्या कार्यक्रमाच्या व्हिडीओ आणि पोस्टनी सोशल मीडियावर खूप पसंती मिळवली होती. अंकिताच्या लग्नाआधी काही दिवस आधीच एक छोटासा अपघात होऊन तिचा पाय जेरबंद झाला होता. तिचं लग्न ठरलेल्या दिवशी होणार की नाही अशी शंका व्यक्त केली जात असतानाच अखेर तिचं लग्न ठरलेल्या दिवशीच होणार ही बातमी आली अनं तिच्या चाहत्यांचा जीव भांड्यात पडला. आता लग्नासाठी अंकितानं पायाच्या दुखण्याकडे दुर्लक्ष केलं पण तिचा पाय अद्याप दुखतच असल्याचं लग्नानंतरच्या तिच्या गृहप्रवेशाच्या व्हिडीओत मात्र स्पष्ट दिसून आलंय.

अंकिता लोखंडे लग्नानंतर आता ऑफिशीयली 'मिसेस. विकी जैन' झालीय तेव्हा विकीच्या घरात तिचा रीतसर गृहप्रवेश व्हायलाच हवा नाही का. तर अंकिता आणि विकी आता नवीन घरात शिफ्ट होणार आहेत. त्या घराचं काम अद्याप पूर्ण झालं नसलं तरी लग्नानंतर अंकिताचा गृहप्रवेश विकीनं नवीन घरातच केला आहे. पारंपरिक पद्धतीनं जैन कुटुंबानंआपल्या अंकिता मॅडमचा गृहप्रवेश केलाय बरं का. अंकिताच्या गृहप्रवेशाचा हा व्हिडीओ तिनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलाय. या व्हिडीओत अंकिताचा पाय दुखावल्यामुळे संपूर्ण गृहप्रवेशाच्या पारंपारिक पद्दती पूर्ण होईपर्यंत विकीनं आपल्या बायकोचा हात हातात धरून जो तिला आधार दिलाय ते फारच क्युट दिसतंय. हा व्हिडीओ इथं जोडत आहोत,नक्की पहा.

Ankita Lokhande,Vicky Jain
सोनाली कुलकर्णीनं सादर केलं कपाटातल्या साड्यांचं कलेक्शन;व्हिडीओ पहा

विकी आणि अंकिता गेल्या तीन-चार वर्षांपासनं एकमेकांना डेट करीत होते. विकी हा बिझनेसमन आहे तर अंकिता सध्या 'पवित्र रिश्ता २' या मालिकेत अर्चनाची मोस्ट पॉप्युलर झालेली भूमिका पुन्हा साकारतेय. अंकिता लोखंडे खरं तर 'पवित्र रिश्ता' या मालिकेमुळे आणि सुशांत सिंग राजपूत सोबतच्या प्रेमप्रकरणामुळे अधिक लोकांच्या लक्षात आहे. पण त्या दोघांचं २०१६ मध्ये ब्रेकअप झालं आणि त्यानंतर अंकिताचं नाव लॅमलाइटमधनं जणू पुसलंच गेलं. पुन्हा कंगनाच्या 'मणिकर्णिका' सिनेमातनं ती ग्लॅमर इंडस्ट्रीत परत आली आणि मग एकदम सुशांतच्या आत्महत्येमुळे ती अधिक प्रकर्षानं समोर आली. सुशांतच्या मृत्युनंतर तिनं त्याच्या कुटुंबाला केलेला सपोर्ट वाखणण्याजोगा,नाहीतर 'आपल्याला काय करायचंय,बरं झालं' असं म्हणून कोणीही सहज पाठ फिरवली असती. पण त्यावेळी अंकिता जे वागली त्यामुळे तिला अधिक पसंद केलं जाऊ लागलं. आणि म्हणूनच बॉलीवूडमध्ये अजूनही स्ट्रगलर म्हणून ओळखल्या जाणा-या अंकिताच्या लग्नाला मात्र बॉलीवूडमधल्या प्रसिद्द लग्नाइतकंच ग्लॅमर मिळालं हे ही तितकंच खरंय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com