Maharashtra Shahir : अंकुश चौधरी साकारणार 'शाहीर साबळे'.. पाहा झलक..

केदार शिंदे दिग्दर्शित 'महाराष्ट्र शाहीर' हा शाहीर साबळे यांचा जीवनपट लवकरच येणार असून प्रमुख भूमिकेत अंकुश चौधरी आहे.
ankush chaudhari play shahir sable's role in maharashtra shahir movie
ankush chaudhari play shahir sable's role in maharashtra shahir moviesakal

शाहीर कृष्णराव गणपतराव साबळे (shahir sable) म्हणजेच महाराष्ट्राचे लाडके शाहीर साबळे. शाहीर साबळे यांच्या गाण्यांवर महाराष्ट्रानेच नाही तर जगाने प्रेम केलं. त्यांचं महाराष्ट्र गीत असो, खंडोबाचा जागर किंवा कोळी गीत.. प्रत्येकच गाणं हे माणसाच्या काळजात हात घालणारं. शाहीर साबळे यांनी महाराष्ट्राला दिलेली 'महाराष्ट्राची लोकधारा' आजही अनेकांच्या स्मरणात आहे. शाहीर साबळे यांच्या पश्चात हा वारसा त्यांचा नातू म्हणजेच दिग्दर्शक केदार शिंदे पुढे नेत आहेत आणि आता तर शाहीर साबळे यांच्या जीवनावर ते चित्रपट करत आहेत. (Maharashtra Shahir Movie Updates)

ankush chaudhari play shahir sable's role in maharashtra shahir movie
PHOTO : शिवानी रांगोळेच्या मेहंदीचा अनोखा साज.. त्यावर कोरलंय विराजसचं नाव..

काही दिवसांपूर्वीच त्यांनी याची घोषणा केली होती. १ मे रोजी या चित्रपताबाबत मोठी घोषणा होणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले होते. त्यामुळे चाहते या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होते. शाहीर साबळे यांची भूमिका कोण साकारणार याची उत्सुकता उभ्या महाराष्ट्राला लागली होती. दरम्यान दिग्दर्शक केदार शिंदे (kedar shinde) आणि अभिनेता अंकुश चौधरी (ankush chaudhari) राज ठाकरे (raj thackeray) यांच्या औरंगाबाद दौऱ्यात सामील होताना दिसले. मुंबई पासूनच ते राज ठाकरे यांच्या सोबत होते. या सभेला हे दोन कलाकार का आले असावेत अशी चर्चा सुरू होती, त्याचे उत्तर रविवारी राज ठाकरे यांच्या सभेत मिळाले.

ankush chaudhari play shahir sable's role in maharashtra shahir movie
प्रदर्शनाआधीच झाली घोषणा.. 'धर्मवीर' चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच..

या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण रविवार औरंगाबाद येथील सभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी केदार शिंदे, अंकुश शिंदे उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र शाहीर या चित्रपटाचे टिझर दाखवण्यात आला. (maharashtra shahir Film Poster Release In raj thackeray Sabha In Aurangabad) यावेळी शाहीर साबळे यांच्या भूमिकेत अंकुश चौधरी असल्याचे जाहीर होताच चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला. हा चित्रपट २८ एप्रिल २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाला अजय अतुल (ajay atul) यांचे संगीत असणार आहे.

आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीला अंकुश चौधरीने शाहीर साबळे यांच्यासोबत काम केले आहे. केदार शिंदे, भारत जाधव, अंकुश चौधरी ही मंडळी शाहीर सांबळे यांच्या कला पथकातूनच पुढे आली आहेत. त्यामुळे अंकुशसाठी ही भूमिका अत्यंत महत्वाची ठरणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com