'अक्षय' की 'रजनीकांत', 'सूर्यवंशी' Vs 'अन्नाथे' ; कोणाचं पारडं जड? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

'अक्षय' की 'रजनीकांत', 'सूर्यवंशी' Vs 'अन्नाथे' ; कोणाचं पारडं जड?
'अक्षय' की 'रजनीकांत', 'सूर्यवंशी' Vs 'अन्नाथे' ; कोणाचं पारडं जड?

'अक्षय' की 'रजनीकांत', 'सूर्यवंशी' Vs 'अन्नाथे' ; कोणाचं पारडं जड?

कोरोना प्रतिबंधक नियम शिथिल केल्यानंतर मनोरंजन विश्वाला दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून दोन वर्षांपूर्वी रखडलेले चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. त्यालाही प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. प्रसिध्द दिग्दर्शक रोहित शेट्टी दिग्दर्शित आणि बॉलीवूडच्या खिलाडीची महत्वाची भूमिका असलेला सूर्यंवंशी हा चित्रपट गेल्या आठवड्यात प्रदर्शित झाला. त्याला अपेक्षेनुसार प्रचंड प्रतिसाद मिळाला. सध्या बॉक्स ऑफिसवर या चित्रपटानं कमाल केली आहे. कोटीच्या कोटी उड्डाणं सूर्यवंशीनं घेतली आहे. दूसरीकडे साऊथचा सुपरस्टार रजनीकांत यांचा अन्नाथे नावाचा चित्रपट जगभरातील दोन हजारांहून अधिक स्क्रीनवर प्रदर्शित झाला आहे.

आता बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार आणि साऊथचा सुपरस्टार रजनीकांत यांच्यात स्पर्धा दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून या दोन्ही चित्रपटांच्या निर्मात्यांनी बॉक्स ऑफिसच्या कमाईची आक़डेवारी सोशल मीडियावर प्रसिद्ध केली आहे. त्यातून या चित्रपटांना मिळालेला प्रतिसाद लक्षात येतो. रजनीकांत यांचा केवळ भारतातच नाहीतर जगातील विविध देशांमध्ये फॅन फॉलोअर्स जास्त आहे. त्यामुळे त्यांच्या चित्रपटानं देखील मोठी सुरुवात केली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यत या चित्रपटानं 200 कोटींहून अधिक व्यवसाय केला आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जाताना मनोरंजन विश्वामध्ये भीतीचे वातावरण होते. अशावेळी अनेक निर्माते आणि दिग्दर्शक यांनी आपले महत्वपूर्ण प्रोजेक्ट पुढीलवर्षी प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला होता. वास्तविक अक्षयचा सूर्यवंशी हा गेल्या वर्षी एप्रिलमध्येच प्रदर्शित होणार होता. मात्र कोरोनामुळे त्याचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले होते. अन्नाथेच्या बाबतही हेच घडलं. आता परिस्थिती काही प्रमाणात आटोक्यात आल्यानं हे दोन्ही चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. त्याला चाहत्यांची पसंती मिळाली आहे.

हेही वाचा: Movie Review; 'जय भीम' सणसणीत 'चपराक'

हेही वाचा: 'मी एकांतवासात जाणार म्हणजे'...; खासदार अमोल कोल्हेंचा खुलासा

गेल्या दोन दिवसांत चैन्नई आणि तामिळनाडूतील बॉक्स ऑफिसनं कमाई केली आहे. सिरुथाई यांनी अन्नाथेचं दिग्दर्शन केलं आहे. नोव्हेंबरच्या 4 तारखेला हा चित्रपट भारतभरात प्रदर्शित झाला. त्याचवेळी अक्षयकुमारचा सूर्यवंशी देखील प्रदर्शित झाला होता. या दोन्ही चित्रपटांनी मोठा व्यवसाय केला आहे. रजनीकांत यांच्या चाहत्यांना आपल्या आवडत्या अभिनेत्याचा परफॉर्मन्स कमालीचा भावला आहे. देशभरातील बॉक्स ऑफिसचं कलेक्शन पाहता अन्नाथे पुढे असल्याचे दिसून आले आहे.

loading image
go to top