Anu Aggarwal: 'आशिकी' फेम अनु पुनरागमनासाठी सज्ज, म्हणाली, 'मी सर्वोत्तम...'

‘आशिकी’ या चित्रपटातून अनु अग्रवालने आपल्या अभिनयाचा जलवा दाखवला.
Anu Aggarwal
Anu AggarwalSakal

बॉलीवूड अभिनेत्री अनु अग्रवाल 'आशिकी' या चित्रपटाने खूप चर्चेत राहिली. यानंतर अभिनेत्री शेवटची 1996 मध्ये आलेल्या 'रिटर्न ऑफ ज्वेल थीफ'मध्ये दिसली होती. दरम्यान, बातमी अशी आहे की, अनु पुन्हा एकदा भव्य कमबॅक करण्यासाठी सज्ज झाली आहे. अभिनेत्री सध्या चांगल्या स्क्रिप्टच्या शोधात आहे.

एका मीडिया संस्थेला दिलेल्या मुलाखतीत अनुने सांगितले की, 'ती अनेक दशकांनंतर चित्रपट साइन करणार आहे, त्यामुळे तिच्यासाठी सर्वोत्तम स्क्रिप्ट असणे महत्त्वाचे आहे. अभिनेत्री म्हणाली की ती लोकांशी देखील चर्चा करत आहे आणि ती प्रकल्प पूर्ण होताच जाहीर करेल.'

Anu Aggarwal
Sonakshi Sinha: कन्फर्म! सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बालच्या नात्याला अर्पिता खानने दिला दुजोरा

अनु पुढे म्हणाली की, 'प्रेक्षकांचे प्रेमच तिला चित्रपटांमध्ये परत आणत आहे. एका सिंगिंग रिअॅलिटी शोच्या एका एपिसोडमध्ये तिचे सीन कट केले तेव्हा तिला सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांकडून खूप पाठिंबा मिळाला. अभिनेत्री म्हणाली की शोमध्ये जे काही घडले त्यानंतर तिने सोशल मीडियावर आपले मत व्यक्त केले आणि लोकांना निर्मात्यांना माफ करण्यास सांगितले.'

अनुने असेही उघड केले की 'तिला मोठे-मोठे मेसेज येऊ लागले होते. हे खूप प्रेरणादायी होते आणि तिला वाटले की लोक तिच्यावर खूप प्रेम करतात. ती इतकी प्रभावित झाली की तिने पुनरागमन करायचे ठरवले. तिच्या मते, इंस्टाग्रामवर तिचे 80 टक्क्यांहून अधिक फॉलोअर्स हे तरुण आहेत ज्यांनी त्यांचे चित्रपट YouTube किंवा OTT वर पाहिले आहेत.'

Anu Aggarwal
Samantha: सामंथा अभ्यासातही हुशारच, दहावीचे रिपोर्ट कार्ड व्हायरल... पाहून चाहते आश्चर्यचकित

अभिनेत्री पुढे म्हणाली की 'तिचा प्रवास खूप छान होता. अपघात आणि नवीन जन्मानंतरच्या जीवनाची तिला चांगली समज होती. 'आशिकी'ची टॅगलाइन 'प्रेम आयुष्याला जिवंत करते' अशी होती आणि आज ती प्रेमाचा प्रसार करत आहे आणि लोकांना त्याबद्दल शिकवत आहे.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com