Samantha: सामंथा अभ्यासातही हुशारच, दहावीचे रिपोर्ट कार्ड व्हायरल... पाहून चाहते आश्चर्यचकित

अभिनेत्री सामंथा रुथ प्रभूचा ‘शाकुंतलम’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.
samantha
samantha Sakal

साउथ फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक सामंथा रुथ प्रभू अलीकडेच तिचे दहावीचे रिपोर्ट कार्ड सोशल मीडियावर लीक झाल्यामुळे चर्चेत आली आहे. ती केवळ अभिनयातच अप्रतिम नाही तर तिचे हे रिपोर्टकार्ड पाहिल्यानंतर ती एक हुशार विद्यार्थिनी देखील आहे हे मान्य केले पाहिजे. या लीक झालेल्या रिपोर्ट कार्डचा फोटोही अभिनेत्रीने शेअर केला आहे.

सामंथाच्या या व्हायरल रिपोर्ट कार्डमध्ये तिला सर्व विषयात 80 पेक्षा जास्त गुण आहेत, तिला गणितात 100 पैकी 100 गुण मिळाले आहेत. दुसरीकडे, इतर बहुतांश विषयांत ९० च्या वर क्रमांक मिळाले आहे.

लीक झालेल्या रिपोर्ट कार्डमुळे तिच्या चाहत्यांना धक्काच बसला नाही तर अभिनेत्रीचे टॅलेंट पाहून तेही आश्चर्यचकित झाले आहेत. हे रिपोर्ट कार्ड पाहिल्यानंतर चाहते त्याच्यावर जोरदार कमेंट करत आहेत, तसेच तिच्या अभिनयासोबतच ती हुशार विद्यार्थी असल्याबद्दल तिचे कौतुकही करत आहेत.

samantha
Krishna Abhishek: कृष्णा अभिषेकने केले कपिल शर्मा शोमध्ये धमाकेदार पुनरागमन; व्हिडिओ व्हायरल

तिच्या रिपोर्ट कार्डचा हा फोटो शेअर करण्यासोबतच समांथाने लिहिले आहे, 'हा हा पुन्हा एकदा समोर आला आहे.' सामंथा तिच्या चाहत्यांसाठी नेहमीच प्रेरणास्थान राहिली आहे, केवळ तिच्या अभिनयानेच नाही तर ती तिचे वैयक्तिक आयुष्य अतिशय चांगल्या प्रकारे सांभाळते. गंभीर आजाराशी झुंज देत असतानाही तिने आपल्या करिअरवर पूर्ण लक्ष केंद्रित केले.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, नुकताच प्रदर्शित झालेला सामंथाचा 'शाकुंतलम' चित्रपट, ज्याचे खूप कौतुक झाले आहे. यावर्षी 1 सप्टेंबरला प्रदर्शित होणाऱ्या अभिनेत्रीच्या 'कुशी' या चित्रपटाचीही चाहते वाट पाहत आहेत. ती वरुण धवनसोबत 'सिटाडेल'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com